श्री
गणेशाय नमः
![]() |
श्री रेणुका देवी |
नमस्कार, मी अजित विनोद पंडीत अष्टागर लेखमालेतील हे सातवे ग्रामपुष्प आपल्या समोर सादर करीत आहे. आपल्या अष्टागरातील सुसंस्कृत ब्राह्मण समाजाविषयीची खूप सकारात्मक माहिती आपण आजवर वाचलीत. आता पुढील गाव नगावे. अनवधानाने कुठला उल्लेख राहिला असल्यास माझ्या व्हाट्सअप क्रमांकावर माहिती द्या उल्लेखनीय बाब असल्यास आपण नक्की add करू.
नगावे :- सफाळे रेल्वे स्थानकापासून अंदाजे ८ कि.मी. अंतरावर हे गाव वसले आहे. गावाच्या ईशान्य दिशेला तलाव असून तलावाचे खोदकाम करताना काही प्राचीन मूर्ती तसेच पायऱ्या सापडल्या आहेत तलाव उत्खननाचे कार्य हे कै. श्री दिवाकर पंडित ह्यांच्या कार्यकाळात झाले असून ते येथे ११ वर्ष सरपंच म्हणून कार्यरत होते, अनेक लोकाभिमुख कामे त्यांनी केली आहेत. तळ्याच्या पश्चिम काठावर श्री वाघ्या देव आपल्या छोटेखानी व टुमदार मंदिरात विराजमान झाले आहेत. तसेच गावात दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर आहे जन्मोत्सवाला येथील ब्रह्मवृंद मारुतीची मनोभावे सेवा करतात कै मोरेश्वर तिवाड ह्यांनी हा उत्सव सुरु व्हावा ह्यासाठी खुप प्रयत्न केले होते समाजात त्यांना बहुमान होता कै. श्री अनंत तिवाड ह्यांनी देखील अनेक लोकाभिमुख कार्य केली असून ते उपसरपंच आणि ग्रामपंचायत संदस्य होते. श्री शेड्या देव ग्रामदैवत आहे. गावात पाटील, जोशी, तिवाड, पंडित, पाध्ये ही कुटुंबे राहतात.
![]() |
श्री मारुती, श्री वाघ्या देव मंदीर, तलाव.. नगावे. |
![]() |
श्री मारुती पालखी, नगावे |
येथील
पाटील आणि जोशी कुटुंब एकच आहे काही मंडळी जोशी तर काही पाटील हे आडनाव लावतात ह्या
कुटुंबाची कुलस्वामिनी श्री रेणुका माता असून कश्यप गोत्र आहे.
तिवाड
कुटुंबाचे गोत्र कात्यायनी असून कोल्हापूर ची श्री महालक्ष्मी त्यांची कुलस्वामिनी
आहे.
पंडित
कुटुंबाचे गोत्र मैत्रेय असून श्री रेणुका माता त्यांची कुलस्वामिनी आहे.
पाध्ये कुटुंबाचे गोत्र जमदग्नी असून श्री मुजबा देवी ही त्यांची कुलस्वामिनी आहे.
मी जसे म्हणतो की आपल्या अष्टागरातील प्रत्येक गावात काही ना काही विशेष आहेच आपला समाज नेहेमीच हुशार आणि सुसंस्कृत मानला जातो आणि त्याची प्रचिती नेहेमी येतेच त्याचे उदाहरण म्हणजे नगावे येथील विरारस्थित श्री विजय सीताराम जोशी (पाटील) हे पेशाने वकील आहेत गावातले पहिलेच पदवीधर आहेत व एल एल बी आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई हायकोर्टात वर्ग दोन अधिकारी म्हणून काम करत असताना एका विशेष केसच्या निकालपत्रात (३२१ पानी) त्यांचा विशेष कार्यासाठी खास उल्लेख केला गेला आहे आणि असे पहिल्यांदा कुणाच्या बाबतीत झाले आहे. १९९१-९२ साली शेअर बाजारात हर्षद मेहता ह्याने केलेल्या घोटाळा प्रकरणाची ही केस होती. आता श्री विजय जी सेवानिवृत्त आहेत, आहे की नाही त्यांचे कार्य उल्लेखनीय आणि अभिमानास्पद बाब.
![]() |
केस च्या निकालपत्रातील श्री विजय जोशी ह्यांचे विशेष उल्लेख असलेले पान |
श्री विजय जोशी ह्यांचा पुत्र प्रथमेश जोशी ह्याने भूतदयेचे खूप छान उदाहरण जगासमोर मांडले आहे, कोरोना लोकडाऊन च्या पार्श्वभूमीवर विरार येथील २० ते २२ श्वानांना (कुत्र्यांना) दोन वेळचे अन्न आणि पाणी स्वखर्चानं ४० दिवस पुरवले आहे. त्याच्या कामाची नोंद महाराष्ट्र टाइम्स ने देखील घेतली होती. प्रथमेश हा इंजिनीअर असून मर्चंट नेवी मध्ये नोकरीस आहे.
![]() |
प्रथमेश चा उल्लेख असलेले कात्रण |
गावातील बारिच मंडळी पौरोहित्य करत असून विरार ते थेट मुंबई, ठाणे परिसरात कार्यरत आहेत. येथे अनेक पदवीधर आहेत, खाजगी तसेच सरकारी नोकरीत आहेत शासनाचा परिवहन RTO विभाग, एस टी येथे कार्यरत आहेत. खाजगी मध्ये काही इंजिनीअर, डेप्युटी मॅनेजर आहेत. येथील होतकरू तरुण निखिल तिवाड, अक्षय पाटील आणि नितीश तिवाड व्यवसायात उतरले असून पूजा साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात, तसेच वसईस्थित श्री श्याम जोशी हे देखील अशाच प्रकारचा व्यवसायात आहेत. मुंबईस्थित श्री संदीप काशिनाथ तिवाड ह्यांचा केबल व्यवसाय आहे. येथील श्री मनोज भालचंद्र पाटील हे वनविभागात परिमंडळ वन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. श्री संजय मोरेश्वर तिवाड हे नोकरीनिमित्त परदेशात आहेत. येथील श्री पांडुरंग विनायक जोशी ह्यांचा छोटासा जनरल स्टोअर्स चा व्यवसाय आहे.
येथील
छाया नरेंद्र तिवाड (पुर्वश्रमीचे नाव) ह्यांचे सुपुत्र श्री अक्षय विश्वनाथ मुळे ह्यांनी
विमान शास्त्राचा अभ्यास केला आहे तसेच शैक्षणिक प्रशिक्षण द्यायचा व्यवसाय आहे त्याने
M.Tech in Mechanics Of food, B. Tech in Aerospace Engineering, MBA in Marketing and Finance केले आहे. विशेष म्हणजे अक्षय ह्यांच्या मातोश्री ह्यांचा देखील वाण
सामान आणि इतर वस्तू विक्रीचा व्यवसाय असून पुर्वाश्रमी त्यांनी बी. ए. पर्यंत शिक्षण
अतिशय बिकट परिस्थिती मध्ये केले आहे.
येथील मुंबईस्थित श्री रवीताभ काशिनाथ जोशी हे यूट्यूबर आहेत त्यांचे यूट्यूब वरील चॅनेल भटकंती एक प्रवास खूप लोकप्रिय आहे लाखो चाहते आहेत या चॅनेलचे. मुंबईतील विविध मूर्तिकार, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, कोळी बँड, इतर वाद्यवृंद आणि असे बरेच काही त्यांच्या चॅनेल वर आपण पाहू शकता. मी लिंक देतो आहे "भटकंती एक प्रवास" ह्यावर क्लिक करून आपण नक्कीच त्यांचे चॅनेल पहा.
गावातील काही मंडळी शेती करत असून गावात सगळ्यात जास्त शेती येथील ब्रह्मवृंदांची आहे. कायमच
ग्रामपंचायती मध्ये येथील सदस्य निवडून येत असतात तर बरेचवेळा सरपंच, तंटामुक्ती समिती
अध्यक्ष आपल्याच समाजाचे आहेत. इथल्या ब्राह्माणेतर समाजात आपल्या समाजाला खूप मान
आहे.
श्री रेणुका देवी : - नगावे येथील पाटील/ जोशी , पंडित कुटुंबाची ही कुलस्वामिनी असून आपण सगळे देवीबद्दल जाणून आहात. नांदेड येथील माहूर येथे देवी विराजीत आहे.
देवीची आख्यायिका :- शिवाची पत्नी पार्वती ने कुब्ज देशाच्या रेणु नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणुची मुलगी ती रेणुका असे तिचे नाव रेणुका झाले. शंकराचे अवतार असलेल्या जमदग्नी समवेत तिचे लग्न झाले. त्यांचे आश्रमात कामधेनू गाय होती. त्या ठिकाणचा राजा सहस्रार्जुनाला ही गाय आपल्याकडे असावी असे वाटू लागले. जमदग्नी ऋषींनी त्याची मागणी अमान्य केली. त्याने जमदग्नींचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला व जमदग्नींना ठार मारले. परशुरामाने कोरी भूमी म्हणून माहूर चे स्थान अंत्यविधी साठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येउ लागली. त्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई भूमीतून वर येउन तुला दर्शन देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते; बाकी भाग जमिनीतच राहिला. या डोक्यास (शिरास) 'तांदळा' म्हणतात.
सौजन्य :- सर्वप्रथम मी आभार मानतो श्री विजय सीताराम जोशी ह्याचे त्यांनी खूप मदत केली आहे मला ही पोस्ट लिहिण्यासाठी, श्री दयेश जोशी तसेच नितीश तिवाड, सौ. कृतिका ओंकार पंडीत ह्यांनी देखील बरीच माहिती दिली आहे.
धन्यवाद,
वाचा
वाचा
आलेवाडी बद्दल माहिती
वाचा
नांदगाव बद्दल माहिती
वाचा
टेंभी बद्दल माहिती
वाचा
सरावली बद्दल माहिती
वाचा
बहाड बद्दल माहिती
वाचा
पोखरण बद्दल माहिती
वाचा
अष्टागर प्रस्तावना
छान
ReplyDeleteधन्यवाद पूनम
Deleteखुप छान वाटलं माहीती वाचुन..
ReplyDeleteKhupch chan
ReplyDeleteधन्यवाद
Deleteगावाविषयी माहिती मांडण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न..परंतू अजुनही बरीच माहिती आपल्या पर्यंत पोहोचलेली नाही...
ReplyDeleteधन्यवाद...आपण पुढे देखील लिहिणार आहोत पुढे मी अनेक पोस्ट लिहेन तेव्हा नक्की उल्लेख करुयात.
DeleteKhup chaan
ReplyDeleteधन्यवाद
Delete