श्री गणेशाय नमः
![]() |
नवान्न पौर्णिमेचे नवकं |
नमस्कार, मी अजित विनोद पंडीत, आज माझ्या ह्या विशेष पोस्ट मध्ये आपण नवान्न पौर्णिमेबद्दल जाणून घेणार आहोत. बरेचदा कोजागिरी आणि नवान्न पौर्णिमा एकाच दिवशी येतात मात्र ह्या वर्षी वेग-वेगळ्या आहेत. आपल्या अष्टागरात नवान्न पौर्णिमेला वेगळे महत्व आहे.
आपल्या महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी आपण शस्त्र पूजन करतो, पाटी पूजन (सरस्वती पूजन)करतो, आपल्या घरातील विविध वस्तू ,वाहने ह्यांची देखील पूजा करतो, सोने वाटले जाते हे सगळे इथे आपल्या अष्टागारात देखील केले जाते मात्र दाराला तोरण नवान्न पौर्णिमेला बांधले जाते.
अष्टागरात
ह्या तोरणाला नवकं असे म्हणतात आणि हे बनवण्याची पद्धत सुद्धा थोडी वेगळी आहे. भरीव
बांबूचा रुंदीने लहान आणि दाराच्या मापाचा तुकडा घेतला जातो तो मध्ये चिरून त्याचे
दोन भाग केले जातात. काही जण दोन बांबू घेऊन हे तोरण बनवतात. आंब्याचे पान, झेंडूचे
फुल, भाताचे कणीस हे सगळे एकत्र करून चिरलेल्या बांबू मध्ये घट्ट बसवले जाते, अशाप्रकारे
एकमेकांना लागून आपल्या दाराला पुरेल इतके गुच्छ लावले जातात. हे तोरण दिसायला अतिशय सुंदर असते. सोबत
एक गुच्छ देखील दोरीला बांधून एकेरी तोरण तयार केले जाते.
हे
नवकं आणि इतर एकेरी तोरणं एका पाटावर ठेवून त्याची पंचोपचारे पूजा केली जाते. आणि घराच्या
मुख्य दाराला हे तोरण बांधले जाते. तयार केलेली एकेरी तोरणं घरातील इतर दारांना, इलेट्रॉनिक
वस्तू, कपाटे, वाहने ह्यांना बांधायची प्रथा आहे. खूप मंगलमय वातावरण असते ह्या दिवशी.
आपल्याला
कल्पना यावी ह्या उद्धेशाने नवक्याचा आणि एकेरी तोरण ह्याचे फोटो सोबत शेअर करत आहे. आहे की नाही वेगळी
प्रथा. ह्या रूढी ह्या प्रथा परंपरांमुळेच अष्टागराने आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे.
![]() |
आंब्याचे पान फुल आणि कणसाचा गुच्छ |
Khup chhan information 👌
ReplyDeleteपूनम आपण नेहमी प्रोत्साहित करता त्यामुळे नवीन लिहायला नवी उमेद मिळते धन्यवाद
Deleteखुपच छान माहिती दिली तुम्ही दादा
ReplyDeleteधन्यवाद भावना आपण आवर्जून अभिप्राय देता
Deleteछान
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखुपच सुंदर माहीती आहे.
ReplyDeleteधन्यवाद अभिप्रायाबद्दल
DeleteHari Om
ReplyDeleteनवीन माहिती मिळाली
खूप छान माहिती
धन्यवाद
Deleteखुप सुंदर माहिती. खरे तर आता सगळं रेडिमेड आणण्याची सवय झाली आहे. विस्मृतीत गेलेल्या गोष्टी तुझ्या लिखाणामुळे समजतात. असाच लिहीत रहा. खुप शुभेच्छा
ReplyDeleteधन्यवाद सर....आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनामुळे नवीन लिहायला प्रोत्साहन मिळते.
Deleteखुप सुंदर माहिती. खरे तर आता सगळं रेडिमेड आणण्याची सवय झाली आहे. विस्मृतीत गेलेल्या गोष्टी तुझ्या लिखाणामुळे समजतात. असाच लिहीत रहा. खुप शुभेच्छा
ReplyDeleteखुपच छान 👌 तोरण सुद्धा फार छान आहे.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसुंदर माहिती
ReplyDeleteसुंदर माहिती
ReplyDeleteधन्यवाद स्वप्नाली
DeleteHari om
ReplyDeleteChhan lihale aahe