Wednesday, September 30, 2020

अष्टागरातील टेंभी गाव

श्री गणेशाय नमः 

 नमस्कार, मी अजित विनोद पंडीत (आलेवाडी) आपल्याला सगळ्यांना अवगत आहेच की आपण या ब्लॉगच्या माध्यमातून अष्टागर ब्राह्मण समाजाविषयी जाणून घेत आहोत. तुमच्या अभिप्रायांवरून मला कळतंय की माझ्याकडून आपल्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळे माहिती विश्वासार्ह आणि खरी असावी हा माझा प्रयत्न असतो. अनावधानाने कुठली माहिती राहिली असेल तर मला माझ्या व्हाट्सअप वर पोस्ट करा माझा नंबर मी आलेवाडी च्या पोस्ट मध्ये दिला आहे. आणखी एक महत्वाचा उल्लेख मी करेन की आपल्या ब्लॉगचा सगळ्यात जास्त वाचकवर्ग पुण्यात आहे तसेच अमेरिका, इंग्लण्ड, दुबई, अशा अनेक देशात आपला ब्लॉग वाचनात येतोय मी त्यांचे आभार मानतो आणि मूळ विषयाकडे येतो आज आपण अष्टागर ब्राह्मण समाज, पालघर ह्यापैकी टेंभी गावाविषयी जाणून घेऊयात. 

 टेंभी :- बोईसर पासून अंदाजे ६ किलोमीटर वर हे गाव असून नवापूर रोड पासून ५०० मीटर आतमध्ये हे गाव वसले आहे. ब्राह्मण लोकवस्तीच्या सुरुवातीलाच श्री दत्तगुरूंचे पवित्र मंदिर आहे. येथे आपल्या अष्टागरातील ब्राह्मणांची अंदाजे लोकसंख्या ५७ असून नोकरी व्यवसायानिमित्त परगावी असणारी लोकसंख्या अंदाजे ११४ आहे. गावात राणे, पंडित आणि पांडे ही कुटुंबे राहत असून राणेंची कुलदेवता सफाळे एडवण येथील श्री आशापुरी माता आहे तर गोत्र गार्ग्य आहे, कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी-कोल्हापूर पंडितांची कुलस्वामिनी असून गोत्र मैत्रेय आहे. पांडे कुटुंबाचे भार्गव हे गोत्र असून श्री महालक्ष्मी-कोल्हापूर त्यांची कुलस्वामिनी आहे. 

येथील ब्रह्मवृंदांची घरे समोरासमोर असून मध्ये रुंद व प्रशस्त रस्ता आहे. येथील जवळपास प्रत्येक घराचा पाया म्हणा किंवा व्हरांडा जमिनीला सलग नसून बऱ्यापैकी उंचीवर आहे. गावात नवीन तसेच पुरातन पद्धतीची छान घरे आहेत. 


पंडितांचे पुरातन घर, टेंभी

                                                                           
ब्रह्मवृंदांची घरे,टेंभी 


आपल्या अष्टागरातील इतर गावाप्रमाणे इथेही काही ना काही विशेष आहेच. सुरुवातीला आपण सुप्रसिद्ध खाजगी गुप्तहेर माननिय रजनी पंडित ह्यांच्या बद्दल माहिती घेवूयात. गावातील पंडित कुटुंबात १९६२ साली रजनी ताईंचा जन्म झाला. त्या मुंबईत वास्तव्याला असतात त्यांचे पूर्ण नाव रजनी शांताराम पंडित आहे, त्यांचे वडील स्वतः सब इन्स्पेक्टर-पोलीस होते. महाराष्ट्रातील आणि भारतातील त्या पहिल्या खाजगी महिला गुप्तहेर ठरल्या आहेत. 
श्री गुरुदेव दत्त, टेंभी 

त्यांच्या मुलाखती आपण खूप वेळा टीव्ही वर पाहतोच त्यांची प्रसिद्धी आपण सगळे जाणून आहोतच. अतिशय Challenging आणि महत्वाकांक्षी करियर त्यांनी निवडले आहे. खूप मोठ-मोठ्या आणि अतिशय गंभीर स्वरूपाच्या केसेस त्यांनी हाताळल्या आहेत. प्रसंगी स्वतःच्या जीवाची बाजी लावून देखील त्यांनी आपले कार्य पूर्ण केले आहे. रजनी ताईंनी दोन पुस्तके लिहिली आहेत पहिले "Faces Behind Faces" आणि दुसरे "मायाजाल"  पहिल्या पुस्तकाला दोन तर दुसऱ्या पुस्तकाला सहा पुरस्कार मिळाले आहेत. 

दूरदर्शन सह्याद्री चा "हिरकणी" पुरस्कार त्यांना मिळाला असून असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांचा संदर्भ घेऊन दिनेश राव ह्यांनी "Lady James Bond" ही डॉक्यूमेंटरी फिल्म बनवली आहे. लवकरच त्यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट येणार आहे. आपल्या सगळ्या अष्टागरातील मंडळीना त्यांचा सार्थ अभिमान आहे. 



सुप्रसिद्ध गुप्तहेर रजनी ताई पंडित 


पुढील माहिती आहे येथील मुंबईस्थित श्री प्रवीण गजानन पंडित ह्यांची, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्रीयुत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तिय असून  "शिवसेना भवनाचा" कार्यभार सांभाळतात. 

टेंभी बद्दल जुनी आठवण सांगायची तर येथील कै. बाजीराव पंडित ह्यांची चुन्याची तसेच विटांची भट्टी होती. पूर्वी बांधकाम करण्यासाठी सिमेंट ऐवजी चुनखडी गुळ व इतर काही साहित्य वापरून माल तयार केला जाई. गुजरात, मुंबई पुणे इथवर ह्या मालास मागणी होती. आणखी एक व्यक्ति कै. नारायण परशुराम पंडित हे त्यावेळेस वेदशास्त्री पंडित होते त्यांना अष्टागारात बहुमान होता. 

टेंभी येथील वेसावे स्थित स्वातंत्र्यसैनिक कै श्री दामोदर नारायण पंडित ह्यांनी १९४२ च्या भारतीय क्रांतिकारी आंदोलनात सहभाग घेतल्याने एक वर्षाचा कारावास भोगला होता ही अभिमानस्पद बाब आहे तसेच त्यांचे सुपुत्र डोंबिवलीस्थित श्री विनोद दामोदर पंडित परिवहन विभागात व त्यांच्या पत्नी सौ चारू विनोद पंडित ह्या बँकेत उच्चपदस्थ होत्या व आता दोघेही सेवानिवृत्त आहेत. त्यांची कन्या सौ ऋचा विनोद पंडित - पुराणिक यांनी रशिया येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून स्त्री रोग तज्ज्ञ (Gynacologist) विशेषज्ञ आहेत तसेच सुपुत्र श्री स्मित विनोद पंडित ह्यांनी अमेरिकेत Master of Science ही पदवी प्राप्त केली आहे व सध्या ऑस्ट्रिया देशात एका नामांकित कंपनीत उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत. 

येथील ब्रम्हवृंद पौरोहित्य, शेती, आणि खाजगी नोकरी करत असून काही मंडळी व्यवसाय करतात काही MBA, Engineering, IT, शिक्षिका, शिक्षक, सरकारी नोकरी, राजकारण अशा क्षेत्रात आहेत. गावातील बरीच मंडळी, मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली येथे नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत तर काही परदेशातही आहेत. काही व्यक्ति नोकरिनिमित्त परदेशवारी करून आले आहेत. आजोळ टेंभी असणारे श्री मोहन जोशी पालघर येथे प्रख्यात वकील आहेत. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच तंटामुक्ती सदस्य या समाजाने गावाला दिले आहेत पुरुषांसोबत येथील स्त्रियांचा यात वाटा आहे. 

काही उल्लेखनीय नावे जसे कि श्रीमती माधवीताई मुरली पंडित ह्या नवीमुंबई येथे मोठ्या पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत. सौ आशा जोशी  टेंभीच्या कन्या बजाज या कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहेत. येथील श्री दर्पण पंडित लंडन येथे  IT Engineer म्हणून कार्यरत असून  त्यांचा SSC बोर्डात जनता हायस्कुल या शाळेत प्रथम क्रमांक आला होता व अनेक वर्ष त्यांच्या एकूण गुणांच्या जवळपासही कोणी विध्यार्थी पोहचू शकले नव्हते. त्यांचे बंधू श्री समीर पंडित देखील IT Engineer असून त्यांची देखील कामानिमित्त लंडन वारी झाली असून इन्फोसिस मध्ये उच्चपदस्थ आहेत. श्री सुभाष पंडित देखील कामानिमित्त ओमान  तसेच टर्की येथे वास्त्यव्यास होते. श्री अरुण पंडित हे देखील ग्रामविकास अधिकारी होते आता सेवानिवृत्त झाले आहेत. सौ चारुशीला पिंपूटकर श्री शंकर नीलकंठ पंडित ह्यांची कन्या त्यांचे स्वतःचे वधुवर सूचक मंडळ होते 30 वर्ष त्यांनी ते चालवले.

आता आपण गावातील दत्तमंदिराविषयी जाणून घेणार आहोत. येथील दत्तमंदिर ब्रम्हवृंद सांभाळत असून १९४५ साली हे मंदिर उदयास आले आहे तत्पूर्वी येथे श्री रामाचे मंदिर होते. कै. श्री मधू पंडित ह्यांनी मंदिर उभारणीत अतिशय महत्वाचा वाटा उचलला होता तसेच गावकऱ्यांनी देखील खूप मेहेनत घेतली आहे. 

श्री पांडुरंग पंडित ह्यांनी मूर्ती तसेच मंदिर बांधणीसाठी लागणारे कारागीर जयपूर हुन आणले होते. श्री पांडुरंग पंडित हे पोलीस पाटील होतेच तसेच सरकारी कंत्राटदार होते ते स्वतः व त्यांचे बंधू कै. बाजीराव पंडित ह्यांनी मंदिरासाठी आपली जागा उपलबद्ध करून दिली होती. 

येथील श्री दत्तगुरूंची संगमरवरातील प्रसन्न मूर्ती धेनु सोबत उभी आहे.पुरातन मंदिराचा आता जीर्णोद्धार झाला आहे. प्रशस्त सभामंडप लाभलेले आणि पावित्र्याने भरलेले हे मंदिर असून मंदिरातील श्री मारुतींची आणि श्री गणेशाची आकर्षक आणि तेजस्वी मूर्ती पाहून मन प्रफुल्लित होते. 

येथील जत्रौत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे, मंदिरात उत्सवाला सुमधुर भजनाचा कार्यक्रम असतो तर येथील पालखी संपूर्ण गावात घरोघरी फिरत असते. मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो तसेच १९७० साला पासून दर वर्षी नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर श्री सत्यनारायणाची महापूजा या मंदिरात घातली जाते. 



 येथील श्री कृष्ण जन्मोत्सवाला १२५ वर्षांची परंपरा असून अष्टागरात त्याकाळी हा एकमेव उत्सव होता अशी मान्यता आहे त्यामुळे येथे संपूर्ण अष्टागरातून मंडळींची आवर्जून उपस्थिती असे. 

गावात प्रामुख्याने दिड दिवसाचा गणेशोत्सव साजरा होतो तर काही मंडळी ५ दिवस साजरा करतात. दत्तजयंती उत्सव तसेच विविध वार्षिक सण येथे मोठ्या आनंदाने साजरे होतात.

धन्यवाद 

अजित विनोद पंडीत

श्री दत्त मंदिर, टेंभी 

   

पालखी सोहळा 


सौजन्य :- मला ही पोस्ट लिहिण्यासाठी माझे मित्र बंधु अनिकेत अविनाश पंडित आणि कुशल अरविंद राणे ह्यांनी खुप मदत केली आहे. तसेच फोटो सौजन्य पुनम अरुण पंडित ह्याच्या सोशल मिडिया अकाउंट वरुन, सर्वांचे धन्यवाद.

वाचा आलेवाडी बद्दल माहिती,
वाचा नांदगांव बद्दल माहिती,
वाचा सरावली प्रस्तावना.
वाचा अष्टागर प्रस्तावना.

48 comments:

  1. अतिशय सुंदर आणि अचूक माहिती...

    ReplyDelete
  2. एक फोन तर करायचा होतास मित्रा...

    ReplyDelete
    Replies
    1. कृपया आपला परिचय दया... आणि आपल्याकडे काही माहिती असल्यास मला दया आपण या पोस्ट मध्ये add करू शकतो..माझा no.9637847937

      Delete
  3. आपल्या अष्टागर वं गोवर्धन ब्राह्मण समाजाला माहितीपटलावर ओळख देण्याचे खुप महान कार्य आपण पेलले आहे त्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन. आपल्या या लेखणीद्वारे जगभरात सर्वदूर पसरलेल्या विस्तीर्ण ब्राह्मण समाजाला अष्टागराविषयी कुतुहल निर्माण होईल याच शंकाच नाही. आपल्या या कार्यात हातभार लावण्याची संधी देऊन मलाही सामावून घेतल्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद🙏

    ReplyDelete
  4. खुप छान माहिती...बरीच माहिती मिळत आहे अष्टागराबद्दल..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...सगळ्यांचे अभिप्राय वाचून बरे वाटले

      Delete
  5. खुप छान माहिती मिळते या ब्लाॅगमुळे.

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. दादा तुला मानाचा मुजरा तुचे काम,घर,कुटुंब सांभाळून तू वेळात वेळ काढून समाजाविषयी आपल्या अष्टागरा विषयी खूप सुंदर सुंदर माहिती देत राहतोस वाचून समाजातील आपल्या लोकांची त्यांच्या कार्याची माहिती आम्हाला मिळते तुझा हा सामाजिक वसा असाच चालू ठेव आम्हाला तुझ्या कार्याचा अभिमान आहे तुझ्या सारखे असेच समाज बांधव व अष्टाघरावर प्रेम करणारे आपल्या अष्टागराला लाभो हिच देवा चरणी प्रार्थना��

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद पूनम, खुप बरे वाटले तुझा अभिप्राय वाचून...आपल्या समाजाचे आपण ऋणी असतो त्यासाठी हा छोटासा प्रयत्न..

      Delete
    2. Actually पण असा विचार सगळ्यांनी करायला हवा

      Delete
  8. Tembhi gavatil eka mahatavachya vayakticha ullekh Tumhi please kara Madhukar Pandit hyanni Tembhi gavat shree Datta Mandir badhanyas khup mehnat ghetli aahe aani sarv gramasthanni pan tyanna support kela

    ReplyDelete
  9. धन्यवाद आपण माहीत दिली त्याबद्दल.... माझा उद्देश हाच आहे कि अष्टागराबद्दल माहिती बाहेर यावी आणि सर्वांपर्यंत पोहोचावी. आपण आता पून्हा एकदा पोस्ट वाचा मी नव्याने मंदिराबद्दल माहिती लिहिली आहे तसेच इतरही काही महत्वाच्या मंडळींचे उल्लेख केले आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप चांगला हेतू आणि उद्देश आहे अजित दादा आज तू निस्वार्थी पणे एकही शुल्क न घेता हे कार्य करत आहेस याचे आम्हा अष्टागरातील लोकांना कौतुक आहे

      Delete
  10. खूप छान माहिती

    ReplyDelete
  11. Khup chaan mahiti. Laxman Pandit hyaancha suddha ullekh karaayla hava. Te primary school madhe prakshyat shikahak hote.

    ReplyDelete
  12. Khup chaan mahiti. Laxman Pandit hyaancha suddha ullekh karaayla hava. Te primary school madhe prakshyat shikahak hote.

    ReplyDelete
  13. अजित दादा तू टेंभी विषयी खूप छान आणि अचुक माहिती दिली. वाचून खूप आनंद झाला. तुझ्या या कामाला माझा सलाम.🙏 आणि हो गोतम जोशी यांनी सांगितले प्रमाणे श्री लक्ष्मण पंडित आणि श्री चंद्रकांत पंडित हे देखील उत्कृष्ट शिक्षक होते. हे दखल नक्की घ्यावी.🙏

    ReplyDelete
  14. आपण कमेंट करत आहात त्याबद्दल धन्यवाद यामुळे खुप नावे पुढे आली आहेत मी या पुढे देखील लिखाण करणार आहे अष्टागरातील पुरोहित, शिक्षक येथील व्यावसायिक यांच्यावर लिहेन त्यावेळी मी प्रत्येकाचा आवर्जून उल्लेख करेन.

    ReplyDelete
  15. खूप छान माहिती. आजोळ विषयी वाचून अभिमान वाटला. धन्यवाद - दिपक वेखंडे

    ReplyDelete
  16. नमस्कार मी सारिका बोनवटे,राहणार टिटवाळा.
    माझ्या सासूबाई सौ संगीता चंद्रशेखर बोनवटे(कमल नथोबा पंडित) सुद्धा पंडित परिवारातूनच आलेल्या आहेत.
    आजोळ म्हणून माझ्या पतींचे टेंबी गावाशी भावनिक संबंध आहेत.
    खूप कमी वेळा माझे टेम्भी गावी जाणे झाले,पण परत परत त्या गावी जाण्याची इच्छा होते.
    आमचे मामा कै श्री लक्षण पंडित(तात्या मामा,) आमची लाडकी ताती मामी थोरले दीर अण्णा, संतोष दादा,आणि संपूर्ण पंडित परिवार यांच्याशी एक घट्ट नाते निर्माण झाले आहे.
    मला एक सांगावेशे वाटते की या माहितीमध्ये श्री लक्ष्मण पंडित,आणि बऱ्याच जेष्ठ व्यक्तींचा उल्लेख असायला हवा होता,कारण या ब्राह्मण कुटुंबाला एकसंघ ठेवण्यात यांचा खूप मोठा वाटा आहे.
    धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आपल्याला टेंभी गावाबद्दल म्हणजेच अष्टागराविषयी प्रेम आपुलकी आहे हे आपल्या कमेंट वरून लक्षात आले, आपली कमेंट वाचून खूप बरे वाटले, आपण येथील व्यक्तींचा उल्लेख केलात यावरून त्या मंडळी किती प्रेमळ आहेत हे कळते. आपल्या ह्या ब्लॉगचा उद्देश हाच आहे कि इथली माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे. आणि माझ्या कडून काही राहून गेले तर आपण ते सगळ्यांसमोर आणताच, मी येथील शिक्षकांसाठी, पुरोहितांची वेगळी पोस्ट लिहिणार आहेच तर त्यात मी नक्की उल्लेख करेन. काही गोष्टी थोड्या पर्सनल होतील या उद्देशाने मी उल्लेख केल्या नाहीत मात्र आपल्या सारखी मंडळी ते समाजापुढे आपल्या कमेंट च्या माध्यमातून आणत आहेत हे हि नसे थोडके'...... पुनश्य धन्यवाद

      Delete
  17. Ashatagarat समाविष्ट असलेल्या आठ गावा बद्दल माहिती जाणुन घ्यायची मला उत्सुकता होती, ह्या गावातील असलेल्या माझ्या आप्तेष्ट बरोबर माझे कुठले तरी नात आहेच, ashtagara मधील काही गावांमध्ये अल्प कालावधी करिता गेलो आहे, परंतु ह्या गावांची माहिती घेता आली नाही. नांदगाव, आले वाडी, tembhi हि माझी प्रिय गाव आहेत. गावातील आप्तेष्ट बरोबर माझे जिव्हाळ्याचे स्नेह बंध आहेत. आपल्या लेखातून ह्या गावा बद्दल चि माहिती प्राप्त झाली. ह्या गावातील काही श्रेष्ठ व्यक्तीचा उल्लेख केला आहेस परंतु काही व्यक्तींचा उल्लेख अनवधानाने राहिला असावा. कारण ह्या जेष्ठ व्यक्ति आता काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत, ह्या सर्व व्यक्तींना विसरता येणे शक्य नाही. तुझ्या लेखामुळे पूर्व स्मृतींना उजाळा मिळाला आहे. ह्या आप्तेष्टांन बद्दल माझे भावनिक संबंध आहेत. Ashtagar लेख मालिका उपक्रम स्तुत्य आहे तो पूर्णत्वास नेल्यास आम्हा वाचकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. माझ्या परमप्रिय रमा काकूंचा नातू ही लेख मालिका शब्द बद्ध करीत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे! हार्दिक अभिनंदन, शुभेच्छा! धन्यवाद!!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद काका...आपण प्रेमाने आणि आपुलकिने माझे कौतुक केलेत आपल्या सारख्या मंडळीकडून दाद मिळणे म्हणजे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे..आणि अनवधानाने खरच काही गोष्टी राहून जातात काही गोष्टी खुप personal होउ शकतात म्हणून नमूद करता येत नाहीत पण आपण समजून घेताय त्याबद्दल धन्यवाद.आपल्या ब्लॉगचा उद्देश्य हाच आहे की येथील माहिती जास्तीत जास्त लोकांसमोर यावी येथेही सुसंस्कृत ब्राह्मण समाज आहे हे सर्वांसमोर आणले जावे, आपली माहिती कुठे तरी मूर्तस्वरुपात अस्तित्वात असावी. पुनश्च धन्यवाद काका

      Delete
    2. आणि हो काका तुमच्या प्रिय रमा काकु म्हणजे माझी आत्याआजी खरच त्या खुप प्रेमळ होत्या व आमच्या घरातील मंडळीसाठी आधारस्तंभ होत्या.

      Delete
  18. खुप सुंदर प्रतिक्रिया दिली आपण.

    ReplyDelete

अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...