श्री गणेशाय नमः
नमस्कार,
माझे नाव श्री अजित विनोद पंडीत तुम्ही जाणताच की मी अष्टागराबद्दल माहिती लिहितो. मी यापुढे अष्टागरातील लग्नसमारंभ ह्याबद्दल माहिती शृंखला सुरू करत आहे थोडक्यात येथे कशाप्रकारे विवाह सोहळे पार पाडले जातात त्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत.
आपल्या भारत देशात किंवा आर्यावर्तात विवाह हा एक संस्कार मनला जातो. लग्न वधु वरांचे जरी असले तरी दोन कुटुंब यामुळे कायमची जोडली जातात.
अष्टागरात विवाह काही एकादिवसात पार पडत नाहीत तर या संस्काराच्या निमित्ताने अनेक सुंदर क्षण, प्रथा, रीतीभाती आणि वेगवेगळ्या प्रसंगांना गायली जाणारी पारंपरिक गाणी यांना आपण उजाळा देणार आहोत. आज सुरुवातीला आपण वधुस कुंकू लावण्याची प्रथा जाणून घेणार आहोत.
जेव्हा वधु आणि वर एकमेकांना पसंत करतात आणि दोन्हीही कुटुंब पुढे जायचा निर्णय घेतात तेव्हा बैठकीचा कार्यक्रम होतो. हि प्रथा सगळीकडे आहे, बैठक यशस्वी झाली की वाङ्निश्चय अर्थात साखरपुडा ठरवला जातो. बैठक आणि साखरपुडा या दोन कार्यक्रमामध्ये एक छोटेखानी कार्यक्रम करण्याची प्रथा येथे आहे त्यास कुंकू लावणे असे म्हणतात.
प्रथेनुसार वधूला तिच्या होणाऱ्या सासरकडची मंडळी अर्थात स्त्रीवर्गातील वराची जवळची स्त्री म्हणजे आई, बहीण, आत्या किंवा वहिनी वधुस हळद कुंकू लावून खणा नारळाने ओटी भरते. वधुस साडीचोळी, सौंदर्य प्रसाधने या वेळी देण्याची पध्दत आहे. या वेळी पाटावर किंवा चौरंगावर होणाऱ्या वधुस बसवले जाते.
होणाऱ्या वरास देखील यावेळी साजेसा आहेर देऊन योग्यतो मानपान केला जातो. ठरलेल्या लग्नास एक मूर्तस्वरूप प्राप्त व्हावे या उद्धेशाने हा छोटेखानी कार्यक्रम केला जातो. शक्यतो बैठकीच्या दिवशीच हा कार्यक्रम उरकून घेतला जातो किंवा दोन्ही पक्षांच्या सवडीनुसार कुंकू लावण्याचा कार्यक्रम पार पडतो.
या वेळेस अल्पउपहार किंवा छोटेखानी स्नेहभोजन केले जाते, या प्रसंगी भटजी अथवा गुरुजींची आवश्यकता नसते. शक्यतो मुलीच्या घरीच दोन्ही कुटुंबे मिळून हा कार्यक्रम करतात.
आज आपण होणाऱ्या वधुस कुंकू लावणे ह्या प्रथेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतलीत पुढे अशा अनेक रिति-भातींबद्दल माहिती घेऊ.
👌
ReplyDeleteधन्यवाद पूनम
Deleteखुप छान वाटलं माहीती वाचुन.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteछान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteछान माहिती, असे बघितलेले प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. चांगले लिखाण
ReplyDeleteछान माहिती, असे बघितलेले प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. चांगले लिखाण
ReplyDeleteधन्यवाद सर
DeleteKhupch chan mahiti ahe
ReplyDeleteधन्यवाद भावना
Deleteखूप सुंदर माहिती दिलीत धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद
Delete