
नमस्कार मी अजित विनोद पंडित, आता मला माझी वेगळी ओळख द्यायची आवश्यकता नाही मात्र नवीन वाचकांसाठी मी माझे नाव नमूद करतो. तुम्हाला सगळ्यांना अष्टागराविषयी माहिती देताना खूप काही गोष्टी मला सुद्धा नव्याने माहिती होत आहेत, नवीन ओळखी होत आहेत, आपल्या अष्टागरातील टॅलेंट बाहेर येतय खूप आनंद होतोय. मला पुन्हा एकदा सगळ्यांना सांगायचे आहे कि आपल्या अष्टागराविषयी माहिती कुठेच लिखित स्वरूपात नाही त्यामुळे मला संपूर्ण माहिती मिळू शकत नाही माहिती देणारे देखील काही प्रशिक्षित नाहीत त्यांना जसे जेवढे शक्य असेल त्याप्रमाणे मला ते मदत करत असतात. त्यांच्या किंवा माझ्या अनावधानाने काही गोष्टी नमूद करायच्या राहिल्या तर आपण सांभाळून घ्यावे. एखादी माहिती राहून गेल्यास हक्काने माझ्या व्हाट्सअप क्रमांकावर द्यावी.
बहाड :- आज आपण अष्टागरातील बहाड गावाविषयी
जाणून घेणार आहोत. अष्टागरातील बहाड आणि पोखरण ही दोन्ही गावे म्हणजे जणू जुळी भावंडंच.
पूर्वी या परिसराला बाडापोखरण म्हणून संबोधत, आजही काही घरांवर तशी नोंद दिसते. बोईसर
डहाणू रस्त्यावर बहाड गाव वसले आहे श्री हनुमानाचे दर्शन झाले की पुढे जाताच ब्रह्मवृदांची
घरे सुरु होतात. माझ्यासाठी बहाडची खास आठवण म्हणजे येथे पिकणारा लाल वाल. असा चविष्ट
वाल इतरत्र मिळणे अशक्यच. आपल्या अष्टागरात वालाचे बिरडे सुप्रसिद्ध आहे हे काही वेगळे
सांगायची आवश्यकता नाही. अष्टागरातील क्वचितच एखादी अन्नपूर्णा गृहिणी असेल की जिने
वालाचे बिरडे केले नाही.
बहाड येथील हनुमान जयंती उत्सव खुप लोकप्रिय असून, गणेशोत्सव खास असतो, गोकुळ अष्टमी देखील अतिशय आनंदाने साजरी केली जाते. होळी हा सण देखील अतिशय हौसेने साजरा केला जातो.
![]() | ||
हनुमान मंदिर, बहाड
|
बहाड
चे पालघर स्थित श्रीयुत अतुल पाठक हे पालघर नागरपालिकेमध्ये तीन वेळा नगरसेवक म्हणून
निवडून आले आहेत यावरून त्यांच्या कार्याचा अंदाज आपल्याला आलाच असेल. त्यांनी परिसरात अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत.
काही उल्लेखनीय नावे :- येथील श्री शिरीष पाठक राष्ट्रीयकृत बँकेच्या मुख्यालयात ४० वर्षे सेवा देत आहेत, येथील ओंकार उल्हास पाठक हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रात असून कामानिमित्त परदेशात वास्तव्यास आहेत. येथील श्री भूषण पाठक आणि प्रशांत पाठक हे गेली ३० वर्षे डायमेकिंगच्या व्यवसायात आहेत. येथील श्री चारुदत्त निवास पाठक ह्यांनी शेतकी क्षेत्रात पदवी घेतली असून आधुनिक पद्धतीने शेती करतात. येथील चारकोप कांदिवली स्थित श्री सुबोध नरहरी पाठक हे व्यवसायाने वकील आहेत ते सर्व क्रिमिनल कोर्टात वकिली करतात तसेच हाय कोर्टात नेहेमीच कार्यरत असून सुप्रीम कोर्टात देखील कार्यरत आहेत. येथील पुणेस्थित श्री अरुण पाठक पुण्यात योगगुरू म्हणून प्रसिद्ध आहेत तर त्यांचे बंधू श्री कांचन पाठक हे बँकेत ब्रांच मॅनेजर होते हल्ली सेवानिवृत्त आहेत. येथील श्री हिमांशू दीपक पाठक हे एन एल पी कोचिंग आणि काउंसिलिंग करतात, मुलांच्या बुद्धिमत्तेसंदर्भात अतिशय महत्वाचे काम करतात.
येथे गावात मुख्यतः पौरोहित्य केले जाते, काही खाजगी व सरकारी नोकरी करतात तसेच काही मंडळी पेश्याने शिक्षक आहेत, काही मंडळी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात आहेत.
येथील लेकी सुना पुढील कामात पारंगत आहेत जसे की गरीब आणि होतकरू विध्यार्थ्यांसाठी विनामूल्य शिकवणी घेणे, काही इंजिनीअर आहेत, काही शिक्षिका आहेत, काही उच्चशिक्षण घेत आहेत.
![]() |
सरस्वती विद्यामंदिर - बाडापोखरण |
येथील कै. जगन्नाथ पाठक हे मेडिकल ऑफिसर म्हणून सरकारी नोकरीत होते मुंबईतला मोठा परिसर ते सांभाळीत असत. त्यांनी १२ वर्ष कुष्ठरोग्यांसाठी काम केले आहे ते ही सेवा निवृत्ती नंतर, एका जर्मन संस्थेसोबत ते बोरिवली (कुष्ठरोग्यांसाठी नॅशनल पार्क येथे कॅम्प होता) येथे काम करीत. डोंबिवली ते बोरिवली रोज लोकल प्रवास करून त्यांनी ही समाजसेवा केली होती पुढे पालघर येथे ते वास्तव्यास होते त्यावेळी पालघर ते बोरीवली असा देखील प्रवास काहीवर्ष केला. नुकतेच त्यांचे अल्पशः आजाराने निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
बहाडला
कलेचा वारसा देखील लाभला आहे येथील श्री प्रवीण पाठक हे उत्तम गायक असून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत गेली अनेक वर्ष ते सुमधुर गाण्यांचे कार्यक्रम करतात. माता सरस्वतीचा
आशीर्वाद लाभलेले श्रीयुत प्रवीण पाठक खूप छान गातात मी त्यांचे गाणे बरेचदा ऐकले आहे
कार्यक्रमात त्यांच्या गाण्याला खूप छान दाद मिळत असते.
![]() |
मेघना एरंडे |
त्यांनी
केलेले अभिनय आणि दिलेले आवाज पुढील प्रमाणे मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, सनई चौघडे,
झेंडा, टाइम पास, दिल दिमाग बत्ती, हिंदीत इंग्लिश बाबू देसी मेम , कसं 'तेरी कसं,
दीदी, एक अजून, रज्जो. डबिंग :- हॉलिवूड चित्रपट:- इंडिपेंडंस डे, ट्विस्टर थे लॉस्ट वर्ल्ड, हॅरी
पॉटर, ट्विलाईट बोन, अजून खूप सारे, कार्टून्स:- नॉडी, निन्जा हातोडी, पेप्पा पिग,
बॉब दी बिल्डर आणखी खूप आहेत.
सौजन्य
:- ही पोस्ट लिहिण्यासाठी मला अनेकांनी मदत केली आहे त्यातील काही नावे कु.अनिकेत अविनाश
पंडित, श्री प्रशांत अनंत पाठक, श्री प्रकाश
पांडे, श्री अतुल पाठक.
वाचा
आलेवाडी बद्दल माहिती
वाचा
नांदगाव बद्दल माहिती
वाचा
टेंभी बद्दल माहिती
वाचा
सरावली बद्दल माहिती
वाचा
अष्टागर प्रस्तावना
पारंपारिक पेहेरावासाठी माझी बहीण सौ अंकिता पंडीत-तिवाड हिच्या "शुभवस्त्रं" ला ह्या लिंक वर क्लिक करून भेट द्या आवडल्यास ऑर्डर करा
![]() |
अजित खुपच सुंदर माहिती लिहिटोस.
ReplyDeleteखूपच मस्त
ReplyDeleteधन्यवाद पूनम
DeleteHari Om
ReplyDeleteKhup chhan Mahiti sanklit Keli aahes
Kram badhatta surekh
Likhanala aniruddha subhechha
धन्यवाद आई
Deleteनेहमीप्रमाणे लेख अगदी उत्कृष्ट आहे. बहाड हे माझे आजोळ त्यामुळे आपसूकच या गावाशी माझे अगदी जिव्हाळ्याचे नाते आहे. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीआधी संपन्न होणाऱ्या वार्षिक परीक्षेचे शेवटचे २-३ पेपर पूर्ण होण्याआधीच मन बहाडला पोहोचलेले असायचे. उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये बहाडला व्यतीत केलेल्या दिवसांच्या आठवणी आजही मनाच्या कोपऱ्यामध्ये तशाच ताज्या आहेत. लेखामध्ये हनुमान जयंती, गणेशोत्सव, होळी, गोकुळाष्टमी इत्यादी उत्सवांचा उल्लेख असायला हवा होता असे मला वाटते. बहाडच्या गणेशोत्सवाची स्वतःचीच अशी एक वेगळी खासियत आहे. त्याचप्रमाणे बहाडला होळी सुद्धा मोठ्या धामधुमीत साजरी केली जाते. बहाडची हनुमान जयंतीसुध्दा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
ReplyDeleteधन्यवाद.. आपण सूचवलेले अमलात येईल
DeleteAti uttam mahiti dilit tumhi
ReplyDeleteDhanywad bhavana
DeleteKhup Chan...
ReplyDeleteReally happy to read about Bahad on a blog. Felt Nostalgic.
Thank you.
You are most welcome and thanks a lot. Pls read all the post of our Ashtagar all are very informative.
Deleteखूप छान वाटलं बहाड बद्दल माहिती वाचुन...
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान सुंदर पद्धतीने मांडले आहे तुम्ही, चांगला उपक्रम आहे तुमचा, नवीन पिढीला आपले गाव आणि आष्टागरा बद्दल चांगली माहिती मिळेल, एक सुचवाचे होते, गावातील प्रत्येक घराची माहिती घेऊन लिहले तर अजून आपला ब्लॉग छान होईल नक्कीच ह्या गोष्टीला वेळ लागेल तुमच्या पुढील उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा 💐 काही संवाद साधण्याचे झाले तर नक्कीच संवाद साधू
ReplyDeleteनाव :- सचिन जगन्नाथ पाठक गाव :- बहाड
राहायला पालघर 9823220544
धन्यवाद तुम्ही सगळे आवर्जून कमेंट करता नवीन माहिती देता त्याबद्दल आपले आभार, नवीन सूचना सुद्धा चांगली आहे भविष्यात नक्कीच त्यावर काम करू.
Deleteखूप छान माहिती मुद्देसूद दिली. धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद....
DeleteThank you for sharing such wonderful information about our Pathak family. Keep up good work.
ReplyDeleteThanks a lot.
Deleteखूप सुंदर लेख ! फारच छान लिखाण शैली . मी राजा महा . दिवंगत . मार्तंड लक्षूमण पाठक यांचा जावई . सौ. शोभना माझी पत्नी .मुक्काम कल्याण . मला माहित नसलेल्या अनेक गोष्टी आपल्या लेखनातून कळल्या . अभिमान वाटतोय अशा गावाशी नातं असल्याचा .
ReplyDeleteमनापासून अभिनंदन !
राजा महा .
धन्यवाद...नक्कीच बहाड सोबत अष्टागरातील प्रत्येक गावाचे काही ना वैशिष्ट्य आहे आणि खरच ते अभिमानास्पद आहे.
DeleteAddition :-
ReplyDeleteMr. Bhushan Pathak and Mr. Prashant Pathak Famois die maker and proprietor of Mill since 30 years.
Late. Mr. Chandulal Pathak and his son Late Mr. Sandesh Pathak were good great priest serving entire Bhandarwada in a very low cost. This tradition is taken on by other aspiring priests.
Also Late Mr. Chandrakant Pathak worked in railways and retired.
I'm not sure who is sharing this information so much publicly... I request to delete personal details from public site.
DeleteI'm not sure who it is..... But if you have any concern feel free to call me.
My name is Tejas Pathak... If you are from my village you surely should have my number.
Addition:-
ReplyDeleteMr. Tejas Girish Pathak successfully working in TCS SINCE 5 YRS .
AND STILL WE ALL BAHADKAR TRY TO COME TOGETHER TO ATTEND ALL FESTIVALS IN A GREAT DEVOTIONAL MODE . NO MATTER IF SOMEONES IS IN PUNE OR NAGPUR OR KOLHAPUR OR MUMBAI WE TAKE OUT TIME FROM OUR BUSY SCHEDULES AND ENJOY TO THE FULLEST.
I'm not sure who is sharing this information so much publicly... I request to delete personal details from public site.
DeleteI'm not sure who it is..... But if you have any concern feel free to call me.
My name is Tejas Pathak... If you are from my village you surely should have my number.
Bahad sarkhya gava madhe rahun jyanni pragati keli...shikshan purna kela tyanchi mahiti takali astit tr bara jhala asta..
ReplyDeleteKontihi nit transportation chi soy nastana sudhha ithe rahun jyanni job kele
Shikshan ghetal tyanni khara gavacha naav motha kela ahe...
Kyupaya jya gavachi mahiti lihito
Tya gavat lagnarya lokanna vicharun ti prakashit karavi.
Mr himanshu pathak is life coach and trainer at sparsh divine..mrs minal saptarshi daughter of dattatrey pathak successfully completed m.com bED.She is working as a teacher
ReplyDeleteThanks a lot Ms Anamit for such a good information, you gave me great information about Bahad. Basically my moto is to store and make available Ashtagar's information. I will definitely add. the information which will be fitted in my blogs format. I can't add such information wich will become more personal. आपली सूचना खूप छान आहे मी आपल्या गावातील मीनल पाठक ह्यांच्याकडून देखील माहिती घेतली होती ज्या वयाची २२ वर्ष बहाड मध्ये राहिल्या आहेत, माझा असा अनुभव आहे की मी जेव्हा ब्लॉग वर पोस्ट करतो त्यानंतर त्या गावाची जास्तीत जास्त माहिती बाहेर येते आणि हाच उद्देश आहे ह्या लेखनाच्या मागे कि माहिती यावी आणि मी प्रकाशित करावी. आपण इतकी छान आणि पोटतिडकीने खोलवर माहिती दिलीत पण आपले साधे नावही नमूद केले नाही ते केले असते तर खूप बरे झाले असते. आपल्या गावाविषयी तुम्हाला खूप अभिमान आहे त्यामुळेच इतकी माहिती मला मिळाली. माझ्या अष्टागर ब्राह्मण समाज पालघर ह्या फेसबुक पेज ला लाईक करून आणखी माहिती देत रहा. पुन्हा एकदा धन्यवाद.
ReplyDeleteसफाळे नगावे तीवाड जोशी यांची कुलस्वामीनी कोणती ते सांगावे.
ReplyDeleteनक्कीच नगावे गावाची पोस्ट मी पुढे लिहिणार आहे त्या मध्ये मी नमूद करेन, आपल्या माहिती साठी सांगतो तिवाड ह्यांची श्री महालक्ष्मी असून जोशी ह्यांची श्री रेणुका माता आहे...विनंती आहे की कमेंट मध्ये आपले नाव नमूद करावे.
DeleteBlog is written when we have full information about the topic we are writting. Right now when u are writting about one of the village u cant be so linient in it.
ReplyDeleteI have written personal information in my post thats bcoz u have already added many personal information in your blog. I have added all the information of the persons who have really worked hard in their lives as u have mentioned many which i would not like to name again and also some u mentioned which we dont even recognise or know them or have not even seen them since born. Those who are really present in the village and have struggled and worked for the betterment of village u have not even mentioned them. Paurohitya is not the main work done here. We are proud of the persons in Bahad who all do it but that is not the main thing, this information is totally wrong. The list or the personal information about the peoples mentioned by me are the people who struggled against all odds and worked hard to reach the designation they retired from or will retire from or who are still working.
Please gather a full fledge information. Hope next time when you write a blog please gather whole information about the particular topic or village from a concern person and then post the same (its a request).
And one more thing I would not disclose my identity but rather than that I would like to tell you I am born n brought in BAHAD AND I AM A PROUD BAHADKAR HOLDING A DEGREE OF BCOM IN FINANCIAL MARKETS. Worked in Mumbai in various firms and now i am proud FREELANCER.
I'm not sure who is sharing this information so much publicly... I request to delete personal details from public site.
DeleteI'm not sure who it is..... But if you have any concern feel free to call me.
My name is Tejas Pathak... If you are from my village you surely should have my number.
Actually...everybody should know up to which level we have to expose our personal details on social media....
DeleteAt least I dare to write on Ashtagar, blaming somebody is to easy criticism is also so easy...I never bother such peoples those are even not mentioned there name in so many comments. माझा शुद्ध हेतु हाच आहे की इथे देखील सुसंस्कृत समाज राहतो माझा ब्लॉग सकारात्मक आणि उल्लेखनीय गोष्टी नमूद करतो, मग ती माणसे जीवंत असो की नसो तुम्ही त्यांना पहिले नाही म्हणून मी त्यांची माहिती लिहू नये असे होत नाही आणि अशी व्यक्ति जी स्वतःचे नाव देखील नमूद करू शकत नाही तिचे ऐकून मी माझे लिहिलेले बदलू शकत नाही कारण ती माणसे अष्टागराची ओळख आहेत, बहाड प्रमाणे अष्टागरातील प्रत्येक गावात struggle आहे खुप मेहनत करुन लोक पुढे गेली आहेत, पहाटे 3 वाजता उठून मुंबई मध्ये शिक्षणसाठी नोकरी साठी जाणारी शेकडो माणसे ह्या अष्टागरात प्रत्येक तिसऱ्या घरात आहेत, गावातुन 8 km लांब पायी चालत जाउन ट्रेन ने प्रवास करणारे घरी येताना न थांबणाऱ्या ट्रेन ला रोज चैन पुलिंग करुन थांबवणे असे खुप struggle केले आहेत अष्टागरातील लोकांनी...ते सगळेच वंदनीय आहेत. अणि पौरोहित्य हे ब्राह्मण समाजाचे आद्य कर्तव्य आहे त्यास तुम्ही नाकारु शकत नाहीत, आपल्या सोइनुसार आपण नवीन क्षेत्र निवडतो.आणि माझा ब्लॉग चुकीचा आहे हे सर्टिफिकेट तुम्ही नका देउ...
ReplyDeleteI agree you dada. Not every personal detail should be exposed. This blog is to write culture of ashtagar. Not just one but every village from ashtagar has done struggle to get higher studies. I have left home at 3 am to catch train at 5.20 (first shuttle) and i belong to alewadi.in such case i have seen many engineers from nandgaon,alewadi tembhi as well and working with L &T like companies. It is your personal blog and go with the pattern ypu follow. Getting a suggestion is nice but what fits in your blog pattern , do follow that. We love that someone atleast dare to write this. Proud of you.
DeleteBest luck
Well said Ankita and thanks for support...Yes We all are strugglers.
Deletecomment मधुन हे माञ नक्की की लवकरच आपल्या ला बहाड गावा बद्दल detail लेख वाचनास मिळेल. अजीतदादा तुझ्या प्रयत्नांना यश मिळाले असे म्हणायला हरकत नाही.
Deleteहो इतकी मंडळी आपला ब्लॉग वाचत आहेत त्यात आपले यश नक्कीच आहे आणि आपण योग्य आणि खरी महिती देण्याचा प्रयत्न करतो
Deleteखूप छान माहिती दिली आहे. आणि हा छान उपक्रम चालू केला आहे ज्याने आपल्या अश्टाघरात काय आहे हे सगळ्यांना समजेल.
ReplyDeleteI really appreciate for your initiative. Keep up the good work.
Ashwini Pathak Sahu
धन्यवाद आपण सगळे मला आणखी पुढे काम करण्यासाठी प्रोत्साहित करताय... Once again thanks a lot
DeleteBahdchya pratek gharache vegale vaishisty aahe that tuzehi asatitv aahe aaplya aajobanche aani tyanchya bahinicha eak vegale nate hote aani tyani te tyanchya shevat pageant javale hote tuje aajoba mithache vyapari hote
ReplyDeleteअजीत मी चेतन गिजरे उर्फ राजू खूप छान वाटलं बहाड बद्दल माहिती वाचुन... बहाड माझे आजोळ मामा च्या गावा ची मजा च वेगळी असायची पूर्वी आम्ही खूप मजा केली आहे त्या आठवणी तू नवीन उजाळा दिलास बरे वाटले...
ReplyDeleteआणखी माहिती जर हवी असेत तर माझी आई श्रीमती नलीनी गिजरे पाठक वय ८३ हयात आहेत त्यांना बऱ्याच जून्या गोष्टी माहिती आहेत.....
धंन्यावाद
राजू गिजरे
9870990962
आपल्या ब्लॉग तर्फे आपण अष्टागराबद्दल सकारात्मक महिती देण्याचा प्रयत्न करतोय, कारण इथे आपला समाज अनेक शतकांपासून राहतोय मात्र आपली माहिती कुठेच उपलब्ध नाही. म्हणून हा छोटासा प्रयत्न.. आपण आपुलकिने नंबर पाठवलात धन्यवाद
Deleteतुम्ही तुमचे प्रयत्न असेच चालू ठेवा,
ReplyDeleteप्रत्येक गावाची सांस्कृतिक माहिती,वैशिट्य, गावासाठी झिजलेले आणि झिजणारी माणसे, हयाची माहिती नक्कीच नवीन पिढीला कळेल, कोन कुठे कामाला जातो,काय काम करतो, कीती शिकला ह्याचे कोणाला घेणे देने नाही
जे गावात राहून ज्यांनी गावपण टिकवले आहे, त्यांना सलाम, त्यांच्या पहिला अधिकार असावा, बाहेर राहणाराने त्यांच्या नेहमीच अभिमान आणि आदर बाळगावा
सचिन जगन्नाथ पाठक
गाव बहाड
राहिला ठिकाण पालघर
धन्यवाद... आपल्या प्रतिक्रिया मला खुप पाठबळ देतात त्यामुळेच नवीन लिहायला प्रोत्साहन मिळते...
Deleteतुम्ही तुमचे प्रयत्न असेच चालू ठेवा,
ReplyDeleteप्रत्येक गावाची सांस्कृतिक माहिती,वैशिट्य, गावासाठी झिजलेले आणि झिजणारी माणसे, हयाची माहिती नक्कीच नवीन पिढीला कळेल, कोन कुठे कामाला जातो,काय काम करतो, कीती शिकला ह्याचे कोणाला घेणे देने नाही
जे गावात राहून ज्यांनी गावपण टिकवले आहे, त्यांना सलाम, त्यांच्या पहिला अधिकार असावा, बाहेर राहणाराने त्यांच्या नेहमीच अभिमान आणि आदर बाळगावा
सचिन जगन्नाथ पाठक
गाव बहाड
राहिला ठिकाण पालघर
mast lekh ahe
ReplyDeleteधन्यवाद
Delete