श्री
गणेशाय नमः
नमस्कार,
मी अजित विनोद पंडीत, आपण आजच्या विशेष पोस्ट मध्ये अष्टागरात दिवाळसण सुरु होण्याआधी वातावरण निर्मिति कशी होते ते जाणून घेणार आहोत. येथे दिवाळी आधी आठवडा साजरा केला जातो, काय आहे हा प्रकार जाणून घेऊयात.
आठवडा :-
अष्टागरात दिवाळीची चाहूल लागते ती आठवड्यापासून, अश्विन महिन्यातील कालाष्टमीला
येथे संध्याकाळी आठवडा साजरा केला जातो तो कसा ते आपण पाहू. भारत हा कृषिप्रधान देश
आहे आणि त्याचा पगडा आपल्या सणवारांवर आहे हे काही मी वेगळे सांगायला नको. अश्विन महिना म्हणजे अष्टागरातील भातशेती मध्ये
पिकलेले भात घरात आलेले असते आणि हे धान्य मोठाल्या कणग्यांमध्ये साठवून ठेवले जाते
आणि अशा कणग्या कायम घरात भरलेल्या राहाव्या या श्रद्धेने हा सण साजरा केला जातो.
हल्ली
फारसे कुणी शेती करत नसले तरी काही ठिकाणी आजही शेती केली जाते आणि घरात कणगे भरून
भात साठवले जाते. ह्याचेच प्रतीक म्हणून आंगणात रांगोळीने कणग्या / कणगे काढले जातात.
पूर्वी भाताच्या टरफलापासून (येथील बोलीभाषेत त्यास तूस म्हणतात ) रांगोळी तयार केली जात
असे हा तूस जाळला की रांगोळी तयार होते. ही रांगोळी एक उत्तम दंतमंजन देखील आहे.
अर्थात
या दिवशी घरातील स्त्रिया अंगणात गोलाकार मोठ्या आकाराचे कणगे रांगोळीने काढतात, सोबत शिडी आणि त्याचा रखवालदार
देखील रांगोळीने साकारला जातो. तसेच गोठ्यामध्ये गाईची पाऊले आणि चंद्र सूर्य रांगोळीने साकारले जातात. पायरीवर रांगोळ्या काढल्या जातात. तिन्हीसांजेला ह्या कणग्यावर नवीन पिकवलेले धान्य ठेवले जाते तसेच पणती ठेवून पूजा केली जाते. घराच्या ओटिवर पणत्या देखील लावल्या जातात. असा हा आठवडा
साजरा झाला की दिवाळीची चाहूल लागते.
मी काही छायाचित्र सोबत जोडत आहे त्यामुळे आपल्याला कल्पना येईल की कशाप्रकारे रांगोळ्या साकारल्या जातात.
![]() |
रांगोळीने साकारलेला कणगा / कणगी |
![]() |
अंगणात साकारलेल्या कणग्या /रांगोळ्या. |
खुप छान माहिती देता तुम्ही दादा
ReplyDeleteधन्यवाद भावना
Deleteखूप छान माहीती...
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान माहिती आहे
ReplyDeleteधन्यवाद
Delete