Wednesday, September 16, 2020

अष्टागर नांदगांव

श्री गणेशाय नमः

नमस्कार मी अजित विनोद पंडीत, आलेवाडी. आपल्याला माझी पहिली पोस्ट आवडली हे तुमच्या प्रतिक्रियांवरून समजले. अष्टागरातील मंडळींनी खूप काही सकारात्मक करून ठेवले आहे मात्र ते लिखित स्वरूपात नाही,  कुठेच काही सापडत नाही, हे सगळे डोक्यात चालू असतानां आपणच का काही करू नये असा विचार मनात तरळला आणि मग केला श्री गणेशा. 

पहिली पोस्ट प्रकाशित झाली आणि तुमच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला, बरीच माहिती तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून, फोन करून दिलीत तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रिया दिल्यात खूप बरे वाटले. ज्यांनी मला ब्लॉग साठी मदत केली त्यांचा मी ऋणी आहे. त्यांचा उल्लेख मी त्यांनी दिलेल्या माहितीच्या खाली नक्की करेन.

आपल्या अष्टागराव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून सुद्धा शुभेच्छा आणि अभिप्राय आले आपल्या समाजातील बदलापूरचे श्रीयुत प्रकाशजी पांडे ह्यांनी सुंदर प्रतिक्रिया दिली आहे त्यांचे असे म्हणणे आहे की अष्टागरात आदरातिथ्य खुप छान केले जाते असा त्यांचा अनुभव आहे. मी आपल्या अष्टागरातर्फे त्यांचे आभार मानतो.

अष्टगरातील आपण सर्व गांवांवषयी जाणून घेणार आहोत आज आपण नांदगांव बददल माहिती घेऊयात.


नांदगाव Nandgaon:-

Nandgaon Beach
Nandgaon Beach नांदगांव  समुद्र किनारा


पालघर तालुक्यात अगदी अरबी समुद्राच्या कुशीत विसावलेले हे सुंदर गाव. नांदगाव चा पारनाका सोडला की रस्त्याच्या दुतर्फा ब्रह्मवृंदांची घरे आढळतात. जुन्या पद्धतीच्या  घरांच्या जागी आता नवीन घरे आढळतात, मात्र आजही काही जुनी घरे दिमाखात उभी आहेत. नांदगाव गाव म्हणजे प्रतीकोकण, नारळी, पोफळी, आंबे ह्या वृक्षांनी नटलेलंयेथे आपल्या अष्टागरातील ब्राह्मणांची अंदाजे ६२ लोकसंख्या आहे. नोकरी व्यवसायानिमित्त काही कुटुंब परगावी असतात त्यांची अंदाजे लोकसंख्या २५ असावी. गावात राणे आणि जोशी ही कुटुंबे आहेत, जोशींचे गौतम तर राणेंचे गार्ग्य गोत्र आहेसफाळे एडवण येथील श्री आशापुरी माता राणे यांची कुलस्वामिनी असून जोशींची कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी-कोल्हापूर आहे. 

येथील राणे कुटुंबात तीन तहसीलदार/मामलेदार होऊन गेले आहेत कै. जयवंत राणे, श्री विनोद राजाराम राणे व सौ वंदना विनोद राणे.  तसेच मुलगी डॉ. जाई विनोद राणे डेंटिस्ट आहे. येथील शिक्षक मंडळी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. येथील काही मंडळी राजकारणात सक्रिय असून नोकरीत उच्चपदावर कार्यरत आहेत. पौरोहित्य, शेती तसेच नोकरी व्यवसाय येथील मंडळी करताना आढळून येतात. नोकरी निमित्त परदेशातही काही मंडळी वास्तव्य करून आलेली आहेत.  सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य या समाजाने गावाला दिले आहेत पुरुषांसोबत येथील स्त्रियांचा यात वाटा आहे. येथील श्री अजित शरद राणे हे कॅम्लिन लिमिटेड येथे उच्चपदस्थ आहेत.

येथील कै. श्री वसंत राणे हे राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले शिक्षक होते. गुरुजींना दिल्ली येथे खुद्द राष्ट्रपतींच्या हस्ते आदिवासींसाठी विशेष कार्य करणारे शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला होता. मला ही प्राथमिक शिक्षणात ते गुरु म्हणून लाभले होते, पाठ्यपुस्तकात सुलभता यावी आणि आपल्या परिसरात दिसणाऱ्या गोष्टी त्यात याव्या या साठी ते नेहेमी आग्रही असत. त्यांना नुकतीच काही महिन्यांपूर्वी देवाज्ञा झाली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

येथील पुरातन शंभू महादेवाचे मंदिर खूप लोभस असून श्रीयुत दांडेकर यांनी उभारले आहे. कोकणातील एखाद्या मंदिराची प्रतिकृती असावी असे हे मंदिर आहे. मंदिर कौलारू असून मंदिरात गणपती मारुती आणि पार्वती च्या मूर्ती देखील आढळतात. श्रावणी सोमवारी येथे भाविकांची मोठी रेलचेल असते, महाशिवरात्रीला येथील शिवलिंग पाहण्याजोगे असते खूप सकारात्मक ऊर्जा या मंदिरात मिळते. 


1शिवमंदीर नांदगाव

Shiv Mandir Nandgaon
शिवमंदीर नांदगाव


महाभारतामध्ये उल्लेख असलेल्या सप्तकुमारिका माता नांदगाव च्या समुद्राकिनारी विराजमान झाल्या असून येथील समाजाच्या त्या आराध्य आहेत. देवींना अनेक नवस सायास केले जातात. तसेच ग्रामदैवता श्री नांदबा देवी यांस लाभली आहे.

राणे कुटुंबाची कुलस्वामिनी आशापुरी माता सफाळे येथील एडवण गावात समुद्रात वसली आहे, समुद्रात एका छोटेखानी बेटावर /टेकडीवर सर्वोच्च ठिकाणी गुहेमध्ये देवी  विराजमान झाली आहे. देवीचे मंदिर देखील खूप सुंदर आहे. या टेकडीवर देवी सोबत काही वृक्ष आहेत त्यांना येथील बोली भाषेत राजणीचे वृक्ष म्हणतात. आता देवी पर्यंत जाण्यासाठी सिमेंटचा मार्ग असून येथे विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. राणे कुटुंबीय नेहेमी देवीच्या मंदिरासाठी सुखसोयी करण्यात तत्पर असतात. समुद्राला भरती असली की या टेकडी च्या चोहोबाजूने पाणी असते. अतिशय नयन रम्य ठिकाण आहे. 

2आशापुरी देवी मंदीर, एडवण

Aashapuridevi Edavan
आशापुरी देवी मंदीर, एडवण


3श्री आशापुरी माता , एडवण

Aashapuri Mata, Edavan
श्री आशापुरी माता , एडवण


4आशापुरी देवी बेट

Aashapuradevi Bet
आशापुरी देवी बेट


सौजन्य:- मला हा ब्लॉग लिहिण्यासाठी माझा मित्र बंधू सनी जोशी आणि आशिष जोशी यांनी बहुमूल्य मदत केली आहे दोघांचे आभार, आशापुरी देवीचे फोटो कीर्ती आणि धीरज वैती यांच्या सौजन्याने.

आपल्या प्रतिक्रिया खाली टिपण्णी वर क्लिक करुन दया.











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना


53 comments:

  1. मस्त रचना...पद्धतशीर मांडणी.
    पुढच्या ब्लॉग साठीची उत्सुकता वाढलेली आहे..
    Keep it up

    ReplyDelete
  2. सुंदर लेख आहे आणि फोटो

    ReplyDelete
  3. माहिती सुंदर संकलित केली आहे.लिखाण अप्रतिम

    ReplyDelete
  4. माहिती सुंदर संकलित केली आहे.लिखाण अप्रतिम

    ReplyDelete
  5. नमस्कार आणि मनःपूर्वक धन्यवाद

    ReplyDelete
  6. धन्यवाद कृपया कमेंट मध्ये आपले नाव नमूद करा

    ReplyDelete
  7. Khup sundar mahiti ahe ani photo's apratim 👌👌

    ReplyDelete
  8. Khup sundar mahiti ahe ani photo's apratim 👌👌

    ReplyDelete
  9. उत्तम आणि सुटसुटीत लिखाण. छान माहिती संग्रहित केलीस. स्वप्नाली नाईक साठे.

    ReplyDelete
  10. खुपच छान माहिती आणि तीही फोटोंसह,आम्ही
    पुढचा ब्लॉग वाचण्यास उत्सुक आहोत .

    ReplyDelete
  11. खुपच छान माहिती आणि तीही फोटोंसह,आम्ही
    पुढचा ब्लॉग वाचण्यास उत्सुक आहोत .

    ReplyDelete
  12. अजित,
    खूपच सुंदर आणि स्तुत्य उपक्रम तसेच अभ्यासपूर्ण आणि बारकाईने माहिती लिहितोस, खूप खूप शुभेच्छा
    अजित राणे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दादा तुमची शाब्बासकीची थाप माझ्या लेखनासाठी खूप महत्वाची आहे

      Delete
  13. अतिशय सुंदर 👌माहिती,वाचताना नांदगाव फिरून आल्यासारखे वाटले.खूप शुभेच्छा 💐💐
    गीतांजली पाध्ये मोरे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ताई तुमच्या प्रतिक्रिया नेहेमी नवीन लिहिण्यास प्रोत्साहित करतात

      Delete
  14. खूप चॅन माहिती मिळते तू।च्या ब्लॉग मधून😊👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचा अभिप्राय वाचून बरे वाटले

      Delete
  15. Kudos and bravo to you Ajit..
    I hv visited Nandgaon quite a few times in my childhood as it is my mothers ajol..
    Best luck..thanks

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot, nostalgia is one of the purposes of our blog. Thats why I said in my previous blog that the umbilical cord of all of us is buried here in Ashtagar.

      Delete
    2. We all used to visit from Tembhi gaon which is my ajol to Rane family,s house...
      Ujwala Rele..

      Delete
    3. Okay... Thanks to share your name so everyone will know how many peoples are belongs to Ashtagar and they really have "Asthaa" in Ashtagar

      Delete
  16. अष्टागराची ओळख खूप सुंदर कल्पना सुचली ह्याबद्दल धन्यवाद.
    संध्या गोगटे

    ReplyDelete
  17. सुंदर
    जयेश पिंपळे

    ReplyDelete
  18. सुंदर
    जयेश पिंपळे

    ReplyDelete
  19. आष्टागराची ओळख खुप सुंदर आणि सोप्या पध्दतीने करून दिली.
    मस्त .

    ReplyDelete
  20. संगीता पाठक.. बहाड..खूप सुंदर लेखन,फोटो पण सुंदर.keep it up. All the best.

    ReplyDelete
  21. अजित खूप छान माहित आहे.

    ReplyDelete
  22. अजित खूपच सुंदर माहीती आहे .

    ReplyDelete
  23. खूपचं छान अजित ,👍🌹👌

    ReplyDelete
  24. Replies
    1. धन्यवाद.... आपण आवर्जून फोनही केलात

      Delete
  25. Khup Sundar lihiles ajit... regards kasturi sudhakar Kulkarni sion

    ReplyDelete
  26. माझे आजोळ खूप छान वाटले, लहानपणी खूप राहिलोय
    सचिन पाठक

    ReplyDelete
  27. कै. श्री वसंत राणे हे राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले शिक्षक होते. गुरुजींना दिल्ली येथे खुद्द राष्ट्रपतींच्या हस्ते आदिवासींसाठी विशेष कार्य करणारे शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला होता. मला ही प्राथमिक शिक्षणात ते गुरु म्हणून लाभले होते, पाठ्यपुस्तकात सुलभता यावी आणि आपल्या परिसरात दिसणाऱ्या गोष्टी त्यात याव्या या साठी ते नेहेमी आग्रही असत. त्यांना नुकतीच काही महिन्यांपूर्वी देवाज्ञा झाली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
    आमचे तात्या आमची मावशी कै. सौ.वैशाली वसंत राणे भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏
    आठवणी ताज्या करणारी माहिती 👌👍

    ReplyDelete
  28. कै. श्री वसंत राणे हे राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले शिक्षक होते. गुरुजींना दिल्ली येथे खुद्द राष्ट्रपतींच्या हस्ते आदिवासींसाठी विशेष कार्य करणारे शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला होता. मला ही प्राथमिक शिक्षणात ते गुरु म्हणून लाभले होते, पाठ्यपुस्तकात सुलभता यावी आणि आपल्या परिसरात दिसणाऱ्या गोष्टी त्यात याव्या या साठी ते नेहेमी आग्रही असत. त्यांना नुकतीच काही महिन्यांपूर्वी देवाज्ञा झाली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
  29. खूप छान आणि सुटसुटीत फ़ोटोसहित माहिती.उत्तम लिखाण.पुढील भागाची प्रतीक्षा राहील. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ����

    ReplyDelete

अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...