Wednesday, September 9, 2020

अष्टागर प्रस्तावना

 

                                                                श्री गणेशाय नमः 

नमस्कार माझे नाव अजित विनोद पंडीत आहे या ब्लॉगच्या माध्यमातून आपण पालघर परिसरात असणाऱ्या "अष्टागरAshtagar या विषयी जाणून घेणार आहोत. अष्टागर हा शब्दप्रचार आठ गाव मिळून झाला आहे. पालघर मधील बहुसंख्य देशस्थ ब्राह्मण Deshasth Brahman समाज या आठ गावात गेल्या अनेक पिढ्या वास्तव्यास आहे. पालघर Palghar परिसरातील ब्राह्मण समाजात अष्टागर म्हणून ही पुढील गावे प्रसिद्ध आहेत.

) नांदगाव,                       ५) बहाड

) आलेवाडी ,                    ) पोखरण ,

) टेंभी,                             ) वेढी,

) सरावली ,                      ) नगावे.

येथील समाज या आठ मूळ गावांचा रहिवासी असला तरी आजू बाजूच्या गावांमध्ये येथील काही कुटुंबे वास्तव्यास आहेत

१) पालघर , २) खामलोली , ३) मनोर, ४) बोईसर , ५) डहाणू /डहाणू  खाडी , ६) नवापूर, ७) आशागड, तसेच अष्टागरातला मोठा समुदाय नोकरी धंद्या निमित्त शहरात स्थलांतरित झाला आहे. विरार वसई पासून थेट मुंबई ठाणे डोंबिवली, पुणे  पर्यंत हा समाज विखुरला गेला असला तरी त्यांची नाळ मात्र या अष्टागरात गाडली आहे.

या समाजातील आडनावे Aadnave पुढील प्रमाणे आहेत.

पंडित/पंडीत , पाठक, फाटक , पाध्ये , जोशी , राणे, नाईक , तिवाड, पाटील, कुलकर्णी, साठे, काही पांडे मंडळी सुद्धा आहेत (Pandit, Pathak, Phatak, Padhye, Tiwad, Joshi, Patil, Kulkarni, Rane, Naik, Sathe, Pande) त्यांची गोत्र भार्गव, भारद्वाज, कौशिक, सांख्यायन, गार्ग्य, जमदग्नी , कात्यायन, गौतम, उपमन्यु, मैत्रेय Bharadwaj, Bhargav, Kaushik, Katyayan, Upamanyu, Saankhyayan, Gautam, Maitray, Gargya, Jamadagni  ही काही उदाहरणे आहेत पुढे विस्तृत माहिती आपण पाहूच

या समाजाला श्री महालक्ष्मी, श्री वेडुबाई, श्री चंडीका, श्री आशापुरा माता , श्री मुजबादेवी, श्री महाजाई, Mahalakshmi, Chandika, Aashapuri Vedubai, Mujaba devi, Mahajai या कुलस्वामिनी म्हणून लाभल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येकाचे ग्रामदैवत त्यांच्या पाठीशी सदैव उभे आहे.

या समाजाने मोठा नावलौकिक मिळविला आहे सुप्रसिद्ध गुप्तहेर मा. रजनी पंडीत-टेंभी Rajani Pandit याच समाजाने दिल्या आहेत. नांदगाव मधील राणे कुटुंबियामध्ये तहसीलदार/मामलेदार असणे ही मोठी बाब आहे. या समाजात कलेची कमतरता नाही आलेवाडी येथील पंडीत कुटुंबाच्या तीन पिढ्या गणपती मूर्ती घडविण्याचे काम अविरतपणे करीत आहेत. डॉक्टर्स, वकील, शिक्षक पत्रकार या समाजातून नावारूपास आले आहेत. पोखरण चे श्रीयुत संजीव शशिकांत जोशी Sanjiv Shashikant Joshi ह्यांनी आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले आहे. वेढी गावचे दोन  सुपुत्र मोठे स्वातंत्र्यसैनिक कै. दत्तात्रय हरी तिवाड Dattatray Hari Tiwad तसेच कै. दयाराम गोविंद पाध्ये (मुळगाव वेढी) कामानिमित्त राहणार मनोर ,या समाजाने दिले आहेत. राजकारणात देखील येथील बरीच मंडळी कार्यरत असून त्या मार्फत देशसेवा करीत आहेत.

या समाजातील बरीच मंडळी पौरोहित्य करतात आसपासच्या ब्राह्मणेतर समाजात तसेच मुंबई मध्ये ही मंडळी कार्यरत आहेत. यात आजची नवीन पिढी सुद्धा मागे नाहीये.

इथला समाज शेती देखील करतो येथील प्रमुख पीक भातशेती असले तरी काही मंडळी कडधान्य देखील पिकवतात भाज्या फळे देखील पिकवली जातात.

गावामध्ये असणाऱ्या ग्रामपंचायती, तंटा-समित्या नगर परिषदा , महानगर पालीका या मध्ये मोठ्या पदावर येथील मंडळी विराजमान आहेत. या समाजातील मंडळींवर येथील ब्राह्मणेतर समाजाचा मोठा विश्वास आहे पंचक्रोशीत या समाजास बहुमान आहे. ब्राह्मणेतर समाजात हा समाज गुण्यागोविंदाने राहत असून समरस झालेला पाहायला मिळतो.

येथील स्त्रिया देखील कुठल्याही बाबतीत मागे नाहीत सुप्रसिद्ध गुप्तहेर मा. रजनी पंडित हे एक मोठे उदाहरण आहे. डॉक्टर्स, डेंटिस्ट, गायनॅकॉलॉजिस्ट, परिचारिका, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी शिक्षिका, शिक्षिका, वकील, पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय, फॅशन डिझायनिंग एक ना अनेक क्षेत्रात या कर्तृत्व शालिनी आपला झेंडा रोवत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक घराचा आत्मा असणारी गृहिणी या समाजाला जोडून ठेवत आहे.

येथील मंडळी मुंबई परिसरात स्वतःच्या कर्तृत्वावर व्यवसाय देखील करत आहे. इव्हेंट मॅनेजमेंट, मॅनुफॅक्चरिंग तसेच छोटे मोठे व्यवसाय हा समाज करत आहे. नोकरीत देखील आम्ही मागे नाही आहोत सरकारी, खाजगी क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर विराजमान आहोत तेही कुठल्याही आरक्षणाशिवाय.

येथील तरुण तरुणी वर्ग अतीशय कार्य-तत्पर आहे अभ्यासात हुशार नोकरी व्यवसायात आपले नाव उंच शिखरावर पोचवत आहे.  इथले नवतरुण पुरोहित Purohit पौरोहित्य, वास्तू शास्त्र, ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करत असून शाळा महाविद्यालयात विविध क्षेत्रातील येथील पदवीधर अग्रेसर आहेत. येथील तरुण वर्ग खाजगी क्षेत्रात देखील नोकरी मध्ये उच्च पदावर जात आहे. क्रीडा कला  क्षेत्रात अभिनयात येथील होतकरू तरुण अग्रेसर आहेत. फोटोग्राफी, यूट्यूब इंटरनेट या क्षेत्रात देखील तरुण तरुणी मागे नाहीत. डॉक्टर्स, फिजिओथेरपिस्ट तसेच वकील आज नावारूपाला येत आहेत. काही होतकरू तरुण शेतीकडे देखील वळले आहेत.   

12 इन 1 आद्य अगरबत्ती संपर्क 9637847937


येथील समाज उत्सवप्रिय आणि धार्मिक आहे पोखरण येथील सार्वजनिक श्री कृष्णजन्मोत्सव Krishnjanmostav त्याचे एक उदाहरण आहे, गणेशोत्सव Ganeshotsav तर घराघरात साजरा केला जातो. येथील गावांमध्ये पुरातन मंदिरे आहेत नांदगाव चे शिवमंदिर त्याचे एक उदाहरण आहे टेंभीचे दत्तमंदिर Datt Mandir , सरावलीत हनुमान मंदिर आहे. अष्टागरात या देवतांचे जत्रौत्सव साजरे होताना दिसतात. विस्तृत माहीत आपण पुढे पाहणार आहोतच.

येथील लेकी देखील अग्रेसर आहेत आपले संसार सांभाळून त्या देखील प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्याची पुढील पिढी अनेक क्षेत्रात पुढे आहे सुप्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर Santosh Juvekar तसेच आवाजाच्या क्षेत्रातील मोठे नाव असणारी मेघना एरंडे Meghna Erande ह्यांचे आजोळ बहाड आहे.

मी विस्तृत माहिती पुढे लिहिणार आहे त्यामुळे माझ्या पुढच्या ब्लॉग साठी आपण मला मदत करू शकता. विस्तृत माहिती साठी आपण प्रत्येक गावाबद्दल जाणून घेऊ माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये .

धन्यवाद ,

अजित विनोद पंडीत











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना


58 comments:

  1. धन्यवाद.... आपले सहकार्य लाखमोलाचे

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सुंदर माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद

      Delete
  2. खुप छान माहिती मांडली आहेस. उत्तम असे काम करतोयस. पुढच्या पिढीला माहिती स्त्रोत निर्माण झालाय.keep it up

    ReplyDelete
  3. धन्यवाद, प्रयत्न केला आहे

    ReplyDelete
  4. sundar lihilay. . khup goshti ithe rahun mahit navtya tya hi samajlya.. keep going. ✌

    ReplyDelete
  5. खुप छान दादा..काही गोष्टी समाजात राहुन देखील माहित नसतात..या निमीत्ताने त्या समजतील..keep going...

    ReplyDelete
  6. खूप सुंदर माहिती आपल्या समाजा विषयी आणि अष्टागराची विषयी

    ReplyDelete
  7. गूगलवर अष्टगर माहितीसाठी चांगली कल्पना आहे .

    ReplyDelete
  8. Sundar mahiti.... Pan tumhi kelva kharekuran shirgav hi nav pan ghyayala havi hoti ethe dekhil aapal samaj agadi gunya govindane rahat aahe

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, मी अष्टगराविषयी लिहित असल्यामुळे ह्या गावांचा उल्लेख नाहीये, मात्र हा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे चिंता नसावी, येत्या ब्लॉग्स मध्ये नक्कीच माहिती दिली जाईल.आणि आपला समाज नक्कीच जिथे आहे तिथे गुण्यागोविंदाने राहतो, म्हणूनच तर "ब्राह्मण शेजार" हा सकारात्मक शब्दप्रचार आपल्या मराठी भाषेत आहे. पुन्हा एकदा धन्यवाद..

      Delete
  9. Well gathered ... u better meet famous people/families interview them...

    ReplyDelete
  10. Well gathered ... u better meet famous people/families interview them...

    ReplyDelete
  11. Well gathered ... u better meet famous people/families interview them...

    ReplyDelete
  12. Thanks a lot, definitely will do in future....Thanks for your valuable suggestions

    ReplyDelete
  13. अतिशय उत्तम लिखाण या माहिती मुळे आपल्या समाजाविषयी खूप काही समजले

    ReplyDelete
  14. अजित, खूपच सुंदर विश्लेषण आणि माहिती लिहिली आहे, बारकाईने अभ्यास केलाय, हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा

    अजित राणे

    ReplyDelete
  15. फार सुंदर माहिती आहे. वाचुन फार छान वाटलं👌

    ReplyDelete
  16. कृपया कंमेंटमध्ये आपल्या नावाचा उल्लेख करा .

    ReplyDelete
    Replies
    1. मी बहाडची..गिरीश पाठकची बायको,संगीता पाठक. खूप स्तुत्य उपक्रम आहे. हे कोणी तरी करायला पाहिजेच होत. ह्यांना सुध्दा 2005 मधे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला, आमच्या एरीयात 400 नारळाची वाडी करणारे हे पहिले होते आणि गावात पाणी आणण्या पासून बर्याच सोयी ह्यांनी केल्या. मी सुध्दा योग,प्राणायाम, मेडीटेशन चे क्लासेस घेते.
      तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद..

      Delete
    2. धन्यवाद..... आपल्या शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत. खूप छान माहिती दिलीत आपण, मला बहाड गावाविषयी लिहिताना याचा उपयोग होईल. मी आपल्या वाडी बद्दल ऐकून आहे व खूप वर्षांपूर्वी वाडी पहिली आहे. अशा खूप सकारात्मक गोष्टी आहेत त्या मला आपल्या समाजासमोर आणायच्या आहेत.काकांच्या सकारात्मक कार्याला प्रणाम व आपले अभिनंदन.

      Delete
  17. हरि ओम
    खूप छान माहिती आभ्यास्पूर्वक मांडली आहेस
    आसाच पुढे लिहीत जा
    अभिनंदन

    ReplyDelete
  18. अभिनंदन
    स्तूत्य उपक्रम
    सद
    अभिनंदन
    स्तूत्य उपक्रम


    ReplyDelete
  19. अभिनंदन
    स्तूत्य उपक्रम


    स्तूत्य उपक्रम


    ReplyDelete
  20. खूपचं छान माहिती आहे अजित keep it up

    ReplyDelete
  21. Kudos and bravo to you Ajit..
    Mi mazya ajol Tembhi hya gavatun lahanpani Nandgaon la jayche karan te mazya Aai che ajol aahe..Ha blog vachun
    Mi nostalgic zale
    .
    Thankyou

    ReplyDelete
  22. thanks a lot. तुम्हा सगळ्यांना ब्लॉग वाचून खूप बरे वाटते, तुम्ही नॉस्टॅल्जिक होता, किंवा काही मंडळींनी अष्टागर पहिले नाही त्यांना आपल्या ब्लॉग च्या माध्यमातून अष्टागर कसे आहे ते कळतंय , हे सगळेच खूप छान आहे आणि माझा उद्देश सुफळ होतोय असे दिसतंय पुन्हा एकदा धन्यवाद.

    ReplyDelete
  23. या निमित्ताने गूगल बरोबर आपल्याला पण अष्टागर नव्याने उमजेल

    ReplyDelete
  24. खूपच सुंदर माहिती मिळाली आज धन्यवाद श्री अजित विनोद पंडीत.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद....कृपया कमेंट मध्ये आपले नाव नमूद करा.

      Delete
  25. खूप सुंदर माहिती.
    संपूर्ण गाव डोळ्यासमोर येते आहे.
    पुढील मजकूराची वाट पाहत आहे.
    All the best
    Madhavi Joshi

    ReplyDelete
  26. धन्यवाद मामी, एका प्रोफेसर कडून अशी प्रतिक्रिया मीळणे म्हणजे अहोभाग्य....

    ReplyDelete
  27. खूप सुंदर माहिती

    ReplyDelete
  28. खूप छान माहिती अजित जी.
    अजून एक माहिती हवी आहे की अष्टागर देशस्थ ब्राम्हणांची कुटुंबे साधारण किती वर्षांपासून किंवा कोणत्या कालखंडात उत्तर कोकणात आली?

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...माझ्याकडे ठोस पुरावा नसल्यामुळे मी ह्याचा उल्लेख केला नाही मात्र या परिसराचा आद्य राजा बिंब येथे येण्यापूर्वीच हा समाज येथे आहे असे माझ्या वाचनात आले आहे अंदाजे 1300 शतक असावे..कृपया आपले नाव कमेंट करा..

      Delete
  29. माझं नाव केदार विश्वास जोशी. मी फेसबुकवर msg केला होता तुम्हाला तुमचा reply नाही मिळाला. मीही देशस्थ आहे पण आमची 36 कुटुंबे राजा बिंबा सोबत 12 व्या शतकात उत्तर कोकणात आली.

    ReplyDelete
    Replies
    1. दादा मी तुम्हाला reply दिला आहे बघा वर कमेंट मध्ये...

      Delete

अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...