Wednesday, September 23, 2020

अष्टागरातील आलेवाडी गाव

 

श्री गणेशाय नमः

नमस्कार, मी अजित विनोद पंडीत तुम्ही मला सगळे ओळखताच मी आलेवाडी येथील कै. विनोद वसंत पंडीत ह्यांचा द्वितीय पुत्र असून मी खाजगी नोकरीत  Assistant Manager Indirect Taxation  या पदावर कार्यरत आहे, आम्ही आलेवाडी येथे राहतो.

आपल्या ब्लॉगला खूप कमी दिवसात भरपूर प्रसिद्धी मिळत आहे आणि तुम्ही सगळे माझ्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असता हे तुमच्या कमेंट मधून लक्षात येत आहे मात्र एक विनंती आहे की आपण कमेंट करताना आपले नाव नमूद करा जेणे करून कोणी कमेंट केली आहे ते कळेल. पोस्ट लिहिण्यासाठी आपल्या अष्टागरातील बरीच मंडळी मला मदत करीत असतात त्यामुळेच मी जास्तीत जास्त माहिती लिहू शकतो. काही वेळेस जर अनावधानाने एखादी माहिती राहून गेली किंवा माझ्यापर्यंत माहिती पोहोचू शकली नाही तर आपण मला माझ्या ९६३७८४७९३७ ह्या संपर्क क्रमांकावर व्हाट्सअप किंवा फोन कॉलच्या माध्यमातून माहीती देऊ शकता.

जसे आपण अष्टागारातील गावांबद्दल जाणून घेतोय तसेच आपण येथील काही शब्द, शब्द-प्रचार तसेच काही म्हणी त्यांच्या अर्थासहित जाणून घेणार आहोत. त्यासाठी माझा अभ्यास सुरु असून लेखन सुरु आहे. तुमच्याकडेही काही शब्द असतील तर शब्द व त्याचा अर्थ मला नक्की व्हाट्सअप करा.

नांदगाव नंतर आपण आज आलेवाडी गावाबद्दल जाणून घेणार आहोत.

आलेवाडी :- नांदगाव ह्या गावाला लागूनच आलेवाडी हे निसर्गरम्य गाव असून समुद्रकिनाऱ्याने या गावाची शोभा वाढते. गावाच्या सुरुवातीला काही अंतरावर येथील ब्राह्मण समाजाची वस्ती आहे. येथील ब्रह्मवृंदाची घरे म्हणजे पुढे अंगण आणि मागे परसबाग, परसात विविध फळांची झाडे असून प्रत्येकाच्या परसात एक विहीर आहे येथील तुळशीवृंदावने घराच्या मागील बाजूस आढळतात. श्री चिंचोबा हे ग्रामदैवत आलेवाडी या गावास लाभले आहे. येथे आपल्या अष्टागरातील ब्राह्मणांची अंदाजे ४५ लोकसंख्या आहे. नोकरी व्यवसायानिमित्त काही कुटुंब परगावी असतात अंदाजे लोकसंख्या १०५ असावी. गावात पंडीत , फाटक आणि नाईक मंडळी राहतात तसेच एक कुटुंब जोशींचे आहे.

पंडीतांचे भार्गव हे गोत्र असून श्री चंडिका माता दाभोळ ही त्यांची कुलस्वामिनी आहे.

फाटक यांचे गोत्र कौशिक असून अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोल्हापूर ची महालक्ष्मी यांची कुलस्वामीनी आहे. नाईक कुटुंबाचे गोत्र उपमन्यु असून कुलस्वामिनी महालक्ष्मी आहे.

दुसऱ्या नाईक कुटुंबाची कुलस्वामिनी श्री वेडुबाई माता उस्मानाबाद गोत्र भारद्वाज आहे.

आणखी एका नाईक कुटुंबाची कुलस्वामिनी श्री महाजाई असून गोत्र परशुराम आहे.

एक कुटुंब पाठक असून कामानिमित्त भाईंदर येथे वास्तव्यास आहे त्यांचे गोत्र सांख्यायन असून श्री महालक्ष्मी त्यांची कुलस्वामिनी आहे.

येथील जोशी कुटुंबाची कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी आहे.

गावाच्या सुरुवातीला वेडुबाईचे छोटेखानी मंदिर असून गावात दुसरे मंदिर श्री दत्ताचे आहे कै. सदानंद फाटक ह्यांनी ते उभारले आहे.

येथील पंडीत कुटुंबाचा गणपती मूर्ती घडवण्याचा व्यवसाय असून तीन पिढ्या ही कला जोपासत आहेत. त्यांच्या चित्रशाळेचे नाव "श्री वसंत चित्रशाळा" असे आहे. येथील मूर्तिकार:- पहिली पीढी कै. वसंत बळवंत पंडीत  दुसरी पिढी  कै. विनोद वसंत पंडीत , श्री विजय वसंत पंडीत आणि तिसरी पिढी श्री सुजित विनोद पंडीत.  गणपती, गौरी, श्री कृष्ण, नवदुर्गा, विश्वकर्मा अशा देवतांच्या मूर्ती येथे साकारल्या जातात, पंचक्रोशीत शाडू मातीच्या मूर्ती मिळण्याचे हे एकमेव ठिकाण आहे.   

श्री वसंत चित्रशाळेतील गणेश मूर्ती
श्री वसंत चित्रशाळेतील गणेश मूर्ती 

Shree vasant chitra shalaa  alewadi
श्री वसंत चित्रशाळेतील विविध मूर्ती 

येथील श्री वेडुबाई मातेचे छोटेखानी मंदिर मनाला शांती देणारे असून देवी सोबत श्री परशुरामाची आणि श्री गणेशाची मूर्ती विराजमान आहे, देवीचे व्याघ्रवाहन आणि कूर्म देवीसमोर नतमस्तक झालेले आढळतात. नाईक कुटुंब मंदिराचा वर्धापन दिन साजरा करतात तसेच नवरात्रौत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. नाईक कुटुंबाच्या कुलस्वामिनीचे मूळ स्थान उस्मानाबाद येथे आहे मंदिर उभारणीच्या वेळेस तेथूनच देवीची मूर्ती तसेच अखंड तेवणारा दीप आणले आहेत. 


shree vedubai
श्री वेडुबाई माता मंदिर आलेवाडी 


श्री वेडुबाई माता ,आलेवाडी 


गावातील आणखी एक छोटेखानी दत्तमंदिर परिसरात प्रसिद्ध असून फाटक कुटुंबीय मंदिराची देखरेख करतात, दत्तजयंती उत्सवाला येथे भक्तांची रीघ लागते. मंदिरात आपले वाहन गो मातेसोबत श्री दत्तांची स्मित हास्य करणारी देखणी मूर्ती असून सोबत आई महालक्ष्मी आणि गणपती च्या मूर्ती मंदिरात पावित्र्य आणतात.



shree datt aalewadi
श्री दत्त मूर्ती आलेवाडी 

ब्राह्मण लोकवस्तीतली ही दोन्ही मंदिरे येथील समाजाची धार्मिकता दर्शवितात. या गावाचे श्री चिंचोबा हे ग्रामदैवत आहे. गावात श्री कृष्ण जन्मोत्सव साजरा होतो तसेच घरो-घरी गौरी गणपती उत्सव आनंदात साजरे होतात. गावातील गणपती उत्सव गौरी विसर्जनादिवशी समाप्त होतो. 

येथील ब्रम्हवृंद पौरोहित्य, शेती, आणि खाजगी नोकरी करत असून काही मंडळी व्यवसाय करतात गावातील बरीच मंडळी, मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली येथे नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष सदस्य या समाजाने गावाला दिले आहेत पुरुषांसोबत येथील स्त्रियांचा यात वाटा आहे.

गावातील लेकी सुना देखील नोकरी-व्यवसाय करतात. ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी शिक्षिका, प्राचार्य, गायन-किर्तन, लॅंडस्केप गार्डनिंग, पर्यटन क्षेत्र, कपड्याचे बुटीक तसेच designer कपड्याचे व्यवसाय केले जातात. सौ. सोनल अजित पंडीत ह्यांची www.nandaigarden.com ह्या वेबसाईट ला आपण नक्की भेट द्या गार्डनिंग च्या टिप्स साठी उपयुक्त आहे. येथील नाईक कुटुंबातील मुली बँकेत उच्च पदस्थ आहेत.

नाईक कुटुंबातील एक सदस्य वकील आहेत. येथील सुधा गजानन फाटक (पूर्वाश्रमीचे नाव) यांचे पुत्र डॉ. श्री शार्दूल कुलकर्णी यांनी PHD in Chemistry केले आहे . आलेवाडी येथे वास्तव्यास असणारे आणि येथील परगावी असणारी बरीच मंडळी MBA, Engineering, Technicians, IT अशा अनेक क्षेत्रात यशस्वी आहेत.

आलेवाडी येथील कन्या मृणाल मनोहर नाईक(पूर्वाश्रमीचे नाव) ह्यांच्या मुलांनी म्हणजेच समीर कमळाकर मुळे आणि नीलेश कमळाकर मुळे ह्यांनी छत्रपती  शिवाजी महाराजांवर मराठीतला पहिला animation चित्रपट "प्रभो शिवाजी राजा" बनवला आहे. दोन्ही भावांनी चित्रपट लिहिला असून नीलेश याने दिग्दर्शन केले आहे. शिवाजी महाराजांबद्दल बरेच वाचन करुन हजारो चित्र या चित्रपटासाठी काढली गेली होती, 16 फेब्रूवारी 2018 ला हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळाला.

येथील निवृत्त शिक्षकगणाना आजही समाजात बहुमान आहे.

भाईंदरस्थित श्री जितेंद्र पंढरी पाठक ह्यांचा गेली १९ वर्षे "कार असेसरीज" बनवण्याचा व्यवसाय आहे. ते राजकारणात सक्रिय असून एका मोठ्या पक्षात ते उच्च पदस्थ आहेत.

आलेवाडीचे भाईंदरस्थित श्रीयुत दीपक मोरेश्वर नाईक हे मानव अधिकार ह्या क्षेत्रात कार्यरत असून त्यात उच्चपदस्थ आहेत तसेच अनेक लोकाभिमुख कार्य ते करत असतात.

गावातील मुंबईस्थित श्रीयुत आशिष नाईक हे व्यवसायाने वकील (मुंबई हाय कोर्ट) असून त्यांचा सुपुत्र स्नुषा दोघेही व्यवसायाने वकील (मुंबई हाय कोर्ट) आहेत. मुलगी Adoption विषयात तज्ञ आहे. त्यांच्या पत्नी डॉक्टर सौ. सुचित्रा आशिष नाईक या पी. एच .डी. इन फिलॉसॉफी असून ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात प्राचार्य  पद भूषवितात. 

आद्य अगरबत्ती - आलेवाडी, संपर्क 9637847937

येथील श्रीयुत श्री रवींद्र नाईक हे महाराष्ट्राचे दूध महासंघाचे माजी अध्यक्ष होते तसेच एका मोठया पक्षात उच्चपदस्थ आहेत, तसेच कै.गोपीनाथजी मुंढे ह्यांचे पी. ए. म्हणून कार्यभार सांभाळला आहे. 

पंडीत कुटुंबाची कुलस्वामिनी श्री चंडिका देवी रत्नागिरीतील दापोली शेजारी दाभोळ येथे आहे, देवीचे कौलारू मंदिर हे आपण कोकणात आहोत ह्याची प्रचिती देते. देवीच्या मंदिर परिसरात एक गोड पाण्याचा झरा आहे. मंदिराच्या आत एका शांत, खोल थंड गुहेमध्ये देवी विसावली आहे. राक्षस मर्दुन देवीने येथे विसावा घेतला आहे, देवीचे लोभस रूप समईच्या मंद प्रकाशात उजळून निघालेले आपण पाहू शकता, देवीला समईचा प्रकाश जास्त प्रिय असावा म्हणूनच आजही गाभाऱ्यात विजेचा दिवा टिकत नाही.

श्री चंडिका देवी दाभोळ 

सौजन्य:- या ब्लॉगसाठी लागणारी तांत्रिक मदत माझी पत्नी सौ. सोनल अजित पंडीत हिने केली असून पोस्ट साठी माहिती व काही फोटोची मदत माझा भाऊ श्री सुजित विनोद पंडीत आणि बहीण सौ श्वेता अपूर्व देशपांडे ह्यांनी केली आहे. 

हिंदू संस्कृती मधील सणांबद्दल माहिती हवी असल्यास माझी बहीण सौ. श्वेता अपूर्व देशपांडे ह्यांचा नव्याने सुरु केलेला   https://shwetadeshpande23.blogspot.com/हा ब्लॉग वाचा.









वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना



22 comments:

  1. मस्त! आपल गाव खरंच खूप लोभनिय आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अंकीता... हो खरे आहे

      Delete
  2. खूपच छान माहिती मिळत आहे. छान लिहीले आहे

    ReplyDelete
  3. खूपच छान माहिती मिळत आहे. छान लिहीले आहे

    ReplyDelete
  4. अंकीता आपल गाव खरंच खूप लोभनिय आहे आणी अजीत दादानी ते आपल्या समोर छानपणे मांडले आहे.

    ReplyDelete
  5. मनःपूर्वक धन्यवाद

    ReplyDelete
  6. अजितजी खुप छान वर्णन केलं आहे आपण आलेवाडीचे माझे वडीलांची मावशी कै गजानन फाटक गुरुजी ह्यांची पत्नी तसेच बोरीवली येथे वास्तव्यास असलेले आलेवाडीचे आप्पा फाटक ह्यांचे पत्नी माझी मावशी असे दुहेरी ऋणानुबंध व नातेसंबंध आलेवाडीशी आहेत. मला दोन वेळा आलेवाडीला येण्याचे योग आला त्या भेटीत आपले गावाचे प्रेमळ आतिथ्य व निसर्ग सौंदर्य आजही माझ्या मनात ताजे आहे ,अनेक वेळा येण्याची इच्छा होते कधी योग येईल तेव्हा संधी सोडणार नाही व आपणांस देखील भेटता येईल असो. खुप चांगल्या आठवणी आपण जागृत केल्यात त्या साठी आपले आभार!!!!!

    ReplyDelete
  7. धन्यवाद.... माझी पोस्ट वाचून आपल्याला बरे वाटले हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे, आपले लिहिलेले वाचून कुणाच्या चेहेऱ्यावर छानसे स्मितहास्य उमटणे किंवा छान आठवणींना उजाळा मिळणे हे खूपच आनंददायी आहे. आलेवाडीयेथील तुमच्या सुंदर आठवणी आपण आमच्या सोबत share केल्या / वाटल्या त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या आलेवाडीच्या मावशी खूप प्रेमळ होत्या मला अजूनही त्या आठवतात. हो आपण नक्कीच भेटू, कृपया आपले नाव कमेंट मध्ये नमूद करा म्हणजे सर्वांना आपला परिचय होईल.

    ReplyDelete
  8. खूपच छान आणि अप्रतिम माहिती ��������

    ReplyDelete
  9. अजित खूपच छान माहिती दिली आहे.

    ReplyDelete
  10. Hari Om
    Khup chhan mahiti aalewadichi lihali aahe

    ReplyDelete
  11. अजित खूप छान वाटत आहे माहिती कळत आहे अपेक्षा वाढल्या आहेत. तुझ्याकडून सोनल चे पण अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मामी तुमचे आशीर्वाद कायम असु देत

      Delete
  12. समीर फाटकSeptember 25, 2020 at 10:14 PM

    उपयुक्त माहिती ,सुंदर लेख

    ReplyDelete
  13. मित्रा,खूप छान मागोवा घेतला आहेस गोवर्धन ब्राह्मण समाजाचा!
    उत्तर कोकणातलं अष्टागर,
    गोरठातील(गोरखगड परिसर) कासगाव किन्हवली, शेणवे ठुणे,लेनाड ब्राह्मणगाव,सासणे वारे,तमनाथ,वाकस,नेरळ
    उत्तर महाराष्ट्रातील सायखेडा, आश्वी,
    पुण्यातील पौड एवढ्या परिसरातील मूळ असलेला गोवर्धन ब्राह्मण समाज शिक्षण,व्यवसायानिमित्त इतरत्र पसरला असून त्याला आपल्या मूळ गावांविषयी फार माहिती नाहीय.तुझ्या ब्लॉग मुळे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल.धन्यवाद मित्रा...
    असंच लिहीत रहा.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद... प्रयत्न केला आहे लिहिण्याचा, आपण देखील छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.... आवर्जून कमेंट केलीत त्याबद्दल सुद्धा आभार.

      Delete

अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...