श्री
गणेशाय नमः
नमस्कार,
मी अजित विनोद पंडीत तुम्ही मला सगळे ओळखताच मी आलेवाडी येथील कै. विनोद वसंत पंडीत
ह्यांचा द्वितीय पुत्र असून मी खाजगी नोकरीत
Assistant Manager Indirect Taxation या पदावर कार्यरत आहे, आम्ही आलेवाडी येथे राहतो.
आपल्या
ब्लॉगला खूप कमी दिवसात भरपूर प्रसिद्धी मिळत आहे आणि तुम्ही सगळे माझ्या पोस्टची
आतुरतेने वाट पाहत असता हे तुमच्या कमेंट मधून लक्षात येत आहे मात्र एक विनंती आहे की आपण कमेंट करताना आपले नाव नमूद करा जेणे करून कोणी कमेंट केली आहे ते कळेल. पोस्ट लिहिण्यासाठी
आपल्या अष्टागरातील बरीच मंडळी मला मदत करीत असतात त्यामुळेच मी जास्तीत जास्त माहिती
लिहू शकतो. काही वेळेस जर अनावधानाने एखादी माहिती राहून गेली किंवा माझ्यापर्यंत
माहिती पोहोचू शकली नाही तर आपण मला माझ्या ९६३७८४७९३७ ह्या संपर्क क्रमांकावर व्हाट्सअप
किंवा फोन कॉलच्या माध्यमातून माहीती देऊ शकता.
जसे
आपण अष्टागारातील गावांबद्दल जाणून घेतोय तसेच आपण येथील काही शब्द, शब्द-प्रचार तसेच
काही म्हणी त्यांच्या अर्थासहित जाणून घेणार आहोत. त्यासाठी माझा अभ्यास सुरु असून
लेखन सुरु आहे. तुमच्याकडेही काही शब्द असतील तर शब्द व त्याचा अर्थ मला नक्की व्हाट्सअप
करा.
नांदगाव नंतर आपण आज आलेवाडी गावाबद्दल जाणून घेणार आहोत.
आलेवाडी
:- नांदगाव ह्या गावाला
लागूनच आलेवाडी हे निसर्गरम्य गाव असून समुद्रकिनाऱ्याने या गावाची शोभा वाढते. गावाच्या
सुरुवातीला काही अंतरावर येथील ब्राह्मण समाजाची वस्ती आहे. येथील ब्रह्मवृंदाची घरे
म्हणजे पुढे अंगण आणि मागे परसबाग, परसात विविध फळांची झाडे असून प्रत्येकाच्या परसात
एक विहीर आहे येथील तुळशीवृंदावने घराच्या मागील बाजूस आढळतात. श्री चिंचोबा हे ग्रामदैवत आलेवाडी या गावास लाभले आहे. येथे आपल्या अष्टागरातील ब्राह्मणांची अंदाजे ४५ लोकसंख्या आहे.
नोकरी व्यवसायानिमित्त काही कुटुंब परगावी
असतात अंदाजे लोकसंख्या १०५ असावी. गावात
पंडीत , फाटक आणि नाईक मंडळी राहतात तसेच एक कुटुंब जोशींचे आहे.
पंडीतांचे
भार्गव हे गोत्र असून
श्री चंडिका माता दाभोळ ही
त्यांची कुलस्वामिनी आहे.
फाटक
यांचे गोत्र कौशिक असून अवघ्या महाराष्ट्राची
कुलस्वामिनी कोल्हापूर ची महालक्ष्मी यांची
कुलस्वामीनी आहे. नाईक कुटुंबाचे
गोत्र उपमन्यु असून कुलस्वामिनी महालक्ष्मी
आहे.
दुसऱ्या
नाईक कुटुंबाची कुलस्वामिनी श्री वेडुबाई माता
उस्मानाबाद व गोत्र भारद्वाज
आहे.
आणखी
एका नाईक कुटुंबाची कुलस्वामिनी
श्री महाजाई असून गोत्र परशुराम
आहे.
एक
कुटुंब पाठक असून कामानिमित्त
भाईंदर येथे वास्तव्यास आहे
त्यांचे गोत्र सांख्यायन असून श्री महालक्ष्मी
त्यांची कुलस्वामिनी आहे.
येथील जोशी कुटुंबाची कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी आहे.
गावाच्या सुरुवातीला वेडुबाईचे छोटेखानी मंदिर असून गावात दुसरे मंदिर श्री दत्ताचे आहे कै. सदानंद फाटक ह्यांनी ते उभारले आहे.
येथील पंडीत कुटुंबाचा गणपती मूर्ती घडवण्याचा व्यवसाय असून तीन पिढ्या ही कला जोपासत आहेत. त्यांच्या चित्रशाळेचे नाव "श्री वसंत चित्रशाळा" असे आहे. येथील मूर्तिकार:- पहिली पीढी कै. वसंत बळवंत पंडीत दुसरी पिढी कै. विनोद वसंत पंडीत , श्री विजय वसंत पंडीत आणि तिसरी पिढी श्री सुजित विनोद पंडीत. गणपती, गौरी, श्री कृष्ण, नवदुर्गा, विश्वकर्मा अशा देवतांच्या मूर्ती येथे साकारल्या जातात, पंचक्रोशीत शाडू मातीच्या मूर्ती मिळण्याचे हे एकमेव ठिकाण आहे.
![]() |
श्री वसंत चित्रशाळेतील गणेश मूर्ती |
![]() |
श्री वसंत चित्रशाळेतील विविध मूर्ती |
येथील श्री वेडुबाई मातेचे छोटेखानी मंदिर मनाला शांती देणारे असून देवी सोबत श्री परशुरामाची आणि श्री गणेशाची मूर्ती विराजमान आहे, देवीचे व्याघ्रवाहन आणि कूर्म देवीसमोर नतमस्तक झालेले आढळतात. नाईक कुटुंब मंदिराचा वर्धापन दिन साजरा करतात तसेच नवरात्रौत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. नाईक कुटुंबाच्या कुलस्वामिनीचे मूळ स्थान उस्मानाबाद येथे आहे मंदिर उभारणीच्या वेळेस तेथूनच देवीची मूर्ती तसेच अखंड तेवणारा दीप आणले आहेत.
![]() |
श्री वेडुबाई माता मंदिर आलेवाडी |
![]() |
श्री वेडुबाई माता ,आलेवाडी |
![]() |
श्री दत्त मूर्ती आलेवाडी |
ब्राह्मण
लोकवस्तीतली ही दोन्ही मंदिरे
येथील समाजाची धार्मिकता दर्शवितात. या गावाचे श्री
चिंचोबा हे ग्रामदैवत आहे.
गावात श्री कृष्ण जन्मोत्सव
साजरा होतो तसेच घरो-घरी गौरी गणपती
उत्सव आनंदात साजरे होतात. गावातील गणपती उत्सव गौरी विसर्जनादिवशी समाप्त
होतो.
येथील ब्रम्हवृंद पौरोहित्य, शेती, आणि खाजगी नोकरी करत असून काही मंडळी व्यवसाय करतात गावातील बरीच मंडळी, मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली येथे नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य या समाजाने गावाला दिले आहेत पुरुषांसोबत येथील स्त्रियांचा यात वाटा आहे.
गावातील लेकी सुना देखील नोकरी-व्यवसाय करतात. ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी शिक्षिका, प्राचार्य, गायन-किर्तन, लॅंडस्केप गार्डनिंग, पर्यटन क्षेत्र, कपड्याचे बुटीक तसेच designer कपड्याचे व्यवसाय केले जातात. सौ. सोनल अजित पंडीत ह्यांची www.nandaigarden.com ह्या वेबसाईट ला आपण नक्की भेट द्या गार्डनिंग च्या टिप्स साठी उपयुक्त आहे. येथील नाईक कुटुंबातील मुली बँकेत उच्च पदस्थ आहेत.
नाईक कुटुंबातील एक सदस्य वकील आहेत. येथील सुधा गजानन फाटक (पूर्वाश्रमीचे नाव) यांचे पुत्र डॉ. श्री शार्दूल कुलकर्णी यांनी PHD in Chemistry केले आहे . आलेवाडी येथे वास्तव्यास असणारे आणि येथील परगावी असणारी बरीच मंडळी MBA, Engineering, Technicians, IT अशा अनेक क्षेत्रात यशस्वी आहेत.
आलेवाडी येथील कन्या मृणाल मनोहर नाईक(पूर्वाश्रमीचे नाव) ह्यांच्या मुलांनी म्हणजेच समीर कमळाकर मुळे आणि नीलेश कमळाकर मुळे ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठीतला पहिला animation चित्रपट "प्रभो शिवाजी राजा" बनवला आहे. दोन्ही भावांनी चित्रपट लिहिला असून नीलेश याने दिग्दर्शन केले आहे. शिवाजी महाराजांबद्दल बरेच वाचन करुन हजारो चित्र या चित्रपटासाठी काढली गेली होती, 16 फेब्रूवारी 2018 ला हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळाला.
येथील निवृत्त शिक्षकगणाना आजही समाजात बहुमान आहे.
भाईंदरस्थित श्री जितेंद्र पंढरी पाठक ह्यांचा गेली १९ वर्षे "कार असेसरीज" बनवण्याचा व्यवसाय
आहे. ते राजकारणात सक्रिय असून एका मोठ्या पक्षात ते उच्च पदस्थ आहेत.
आलेवाडीचे भाईंदरस्थित श्रीयुत दीपक मोरेश्वर नाईक हे मानव अधिकार ह्या क्षेत्रात कार्यरत असून त्यात उच्चपदस्थ आहेत तसेच अनेक लोकाभिमुख कार्य ते करत असतात.
गावातील
मुंबईस्थित श्रीयुत आशिष नाईक हे
व्यवसायाने वकील (मुंबई हाय कोर्ट) असून त्यांचा सुपुत्र
व स्नुषा दोघेही व्यवसायाने वकील (मुंबई हाय कोर्ट) आहेत.
मुलगी Adoption विषयात तज्ञ आहे. त्यांच्या पत्नी डॉक्टर सौ. सुचित्रा आशिष
नाईक या पी. एच
.डी. इन फिलॉसॉफी असून
ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात
प्राचार्य पद
भूषवितात.
आद्य अगरबत्ती - आलेवाडी, संपर्क 9637847937 |
![]() |
श्री चंडिका देवी दाभोळ |