श्री गणेशाय नमः
नमस्कार माझे नाव अजित विनोद पंडीत आहे या ब्लॉगच्या माध्यमातून आपण पालघर परिसरात असणाऱ्या "अष्टागर" Ashtagar या विषयी जाणून घेणार आहोत. अष्टागर हा शब्दप्रचार आठ गाव मिळून झाला आहे. पालघर मधील बहुसंख्य देशस्थ ब्राह्मण Deshasth Brahman समाज या आठ गावात गेल्या अनेक पिढ्या वास्तव्यास आहे. पालघर Palghar परिसरातील ब्राह्मण समाजात अष्टागर म्हणून ही पुढील गावे प्रसिद्ध आहेत.
१)
नांदगाव, ५) बहाड
२)
आलेवाडी , ६) पोखरण
,
३)
टेंभी, ७) वेढी,
४)
सरावली , ८) नगावे.
येथील
समाज या आठ मूळ गावांचा रहिवासी असला तरी आजू बाजूच्या गावांमध्ये येथील काही कुटुंबे
वास्तव्यास आहेत
१)
पालघर , २) खामलोली , ३) मनोर, ४) बोईसर , ५) डहाणू /डहाणू खाडी , ६) नवापूर, ७) आशागड, तसेच अष्टागरातला मोठा
समुदाय नोकरी धंद्या निमित्त शहरात स्थलांतरित झाला आहे. विरार वसई पासून थेट मुंबई
ठाणे डोंबिवली, पुणे पर्यंत हा समाज विखुरला
गेला असला तरी त्यांची नाळ मात्र या अष्टागरात गाडली आहे.
या समाजातील आडनावे Aadnave पुढील प्रमाणे आहेत.
पंडित/पंडीत , पाठक, फाटक , पाध्ये , जोशी , राणे, नाईक , तिवाड, पाटील, कुलकर्णी, साठे, काही पांडे मंडळी सुद्धा आहेत (Pandit, Pathak, Phatak, Padhye, Tiwad, Joshi, Patil, Kulkarni, Rane, Naik, Sathe, Pande) त्यांची गोत्र भार्गव, भारद्वाज, कौशिक, सांख्यायन, गार्ग्य, जमदग्नी , कात्यायन, गौतम, उपमन्यु, मैत्रेय Bharadwaj, Bhargav, Kaushik, Katyayan, Upamanyu, Saankhyayan, Gautam, Maitray, Gargya, Jamadagni ही काही उदाहरणे आहेत पुढे विस्तृत माहिती आपण पाहूच.
या समाजाला श्री महालक्ष्मी, श्री वेडुबाई, श्री चंडीका, श्री आशापुरा माता , श्री मुजबादेवी, श्री महाजाई, Mahalakshmi, Chandika, Aashapuri Vedubai, Mujaba devi, Mahajai या कुलस्वामिनी म्हणून लाभल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येकाचे ग्रामदैवत त्यांच्या पाठीशी सदैव उभे आहे.
या समाजाने मोठा नावलौकिक मिळविला आहे सुप्रसिद्ध गुप्तहेर मा. रजनी पंडीत-टेंभी Rajani Pandit याच समाजाने दिल्या आहेत. नांदगाव मधील राणे कुटुंबियामध्ये ३ तहसीलदार/मामलेदार असणे ही मोठी बाब आहे. या समाजात कलेची कमतरता नाही आलेवाडी येथील पंडीत कुटुंबाच्या तीन पिढ्या गणपती मूर्ती घडविण्याचे काम अविरतपणे करीत आहेत. डॉक्टर्स, वकील, शिक्षक पत्रकार या समाजातून नावारूपास आले आहेत. पोखरण चे श्रीयुत संजीव शशिकांत जोशी Sanjiv Shashikant Joshi ह्यांनी आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले आहे. वेढी गावचे दोन सुपुत्र मोठे स्वातंत्र्यसैनिक कै. दत्तात्रय हरी तिवाड Dattatray Hari Tiwad तसेच कै. दयाराम गोविंद पाध्ये (मुळगाव वेढी) कामानिमित्त राहणार मनोर ,या समाजाने दिले आहेत. राजकारणात देखील येथील बरीच मंडळी कार्यरत असून त्या मार्फत देशसेवा करीत आहेत.
या
समाजातील बरीच मंडळी पौरोहित्य
करतात आसपासच्या ब्राह्मणेतर समाजात तसेच मुंबई मध्ये
ही मंडळी कार्यरत आहेत. यात आजची नवीन
पिढी सुद्धा मागे नाहीये.
इथला
समाज शेती देखील करतो येथील प्रमुख पीक भातशेती असले तरी काही मंडळी कडधान्य देखील
पिकवतात भाज्या फळे देखील पिकवली जातात.
गावामध्ये
असणाऱ्या ग्रामपंचायती, तंटा-समित्या नगर
परिषदा , महानगर पालीका या मध्ये मोठ्या
पदावर येथील मंडळी विराजमान आहेत. या समाजातील मंडळींवर
येथील ब्राह्मणेतर समाजाचा मोठा विश्वास आहे
पंचक्रोशीत या समाजास बहुमान
आहे. ब्राह्मणेतर समाजात हा समाज गुण्यागोविंदाने
राहत असून समरस झालेला
पाहायला मिळतो.
येथील
स्त्रिया देखील कुठल्याही बाबतीत मागे नाहीत सुप्रसिद्ध
गुप्तहेर मा. रजनी पंडित
हे एक मोठे उदाहरण
आहे. डॉक्टर्स, डेंटिस्ट, गायनॅकॉलॉजिस्ट, परिचारिका, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी शिक्षिका, शिक्षिका, वकील, पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय, फॅशन डिझायनिंग एक ना अनेक
क्षेत्रात या कर्तृत्व शालिनी
आपला झेंडा रोवत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचे
म्हणजे प्रत्येक घराचा आत्मा असणारी गृहिणी या समाजाला जोडून
ठेवत आहे.
येथील
मंडळी मुंबई परिसरात स्वतःच्या कर्तृत्वावर व्यवसाय देखील करत आहे. इव्हेंट
मॅनेजमेंट, मॅनुफॅक्चरिंग तसेच छोटे मोठे
व्यवसाय हा समाज करत
आहे. नोकरीत देखील आम्ही मागे नाही आहोत
सरकारी, खाजगी क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर विराजमान आहोत तेही कुठल्याही
आरक्षणाशिवाय.
येथील तरुण तरुणी वर्ग अतीशय कार्य-तत्पर आहे अभ्यासात हुशार नोकरी व्यवसायात आपले नाव उंच शिखरावर पोचवत आहे. इथले नवतरुण पुरोहित Purohit पौरोहित्य, वास्तू शास्त्र, ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करत असून शाळा महाविद्यालयात विविध क्षेत्रातील येथील पदवीधर अग्रेसर आहेत. येथील तरुण वर्ग खाजगी क्षेत्रात देखील नोकरी मध्ये उच्च पदावर जात आहे. क्रीडा कला क्षेत्रात अभिनयात येथील होतकरू तरुण अग्रेसर आहेत. फोटोग्राफी, यूट्यूब इंटरनेट या क्षेत्रात देखील तरुण तरुणी मागे नाहीत. डॉक्टर्स, फिजिओथेरपिस्ट तसेच वकील आज नावारूपाला येत आहेत. काही होतकरू तरुण शेतीकडे देखील वळले आहेत.
12 इन 1 आद्य अगरबत्ती संपर्क 9637847937 |
येथील समाज उत्सवप्रिय आणि धार्मिक आहे पोखरण येथील सार्वजनिक श्री कृष्णजन्मोत्सव Krishnjanmostav त्याचे एक उदाहरण आहे, गणेशोत्सव Ganeshotsav तर घराघरात साजरा केला जातो. येथील गावांमध्ये पुरातन मंदिरे आहेत नांदगाव चे शिवमंदिर त्याचे एक उदाहरण आहे टेंभीचे दत्तमंदिर Datt Mandir , सरावलीत हनुमान मंदिर आहे. अष्टागरात या देवतांचे जत्रौत्सव साजरे होताना दिसतात. विस्तृत माहीत आपण पुढे पाहणार आहोतच.
येथील लेकी देखील अग्रेसर आहेत आपले संसार सांभाळून त्या देखील प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्याची पुढील पिढी अनेक क्षेत्रात पुढे आहे सुप्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर Santosh Juvekar तसेच आवाजाच्या क्षेत्रातील मोठे नाव असणारी मेघना एरंडे Meghna Erande ह्यांचे आजोळ बहाड आहे.
मी विस्तृत माहिती पुढे लिहिणार आहे त्यामुळे माझ्या पुढच्या ब्लॉग साठी आपण मला मदत करू शकता. विस्तृत माहिती साठी आपण प्रत्येक गावाबद्दल जाणून घेऊ माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये .
धन्यवाद ,
अजित विनोद पंडीत