Friday, August 13, 2021

अष्टागरातील नागपंचमी

 श्री गणेशाय नमः


नमस्कार, मी अजित विनोद पंडीत आज आपण नागपंचमी या सणाबद्दल माहिती घेणार आहोत, आपल्याकडे श्रावण महीना सुरू झाला की पहिला सण नागपंचमी येतो आपल्याला माहिती आहेच की आपल्या आर्यावर्तात प्राणी पक्षी आणि एकूणच निसर्गास देव मानून त्याचे संवर्धन केले जाते त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागाचे प्रतिकात्मक पूजन केले जाते. अष्टागरातील नागपंचमी कशी असते ते जाणुन घेऊयात.

चंदन आणि हळद उगाळून पाटावर नऊ किंवा आपल्या प्रथेनुसार नाग काढले जातात त्यातील एक नाग शेपूट नसलेला असतो. काही ठिकाणी हळद, कुंकू, अबीर, कडधान्य, तृणधान्य, लाह्या ह्यापासून नाग काढले जातात. जमिनीवर पाट ठेवून त्याचे षोडशोपचारे पूजन करतात चंदनाचे नाग काढलेला पाट भिंतीला लावून एक पाट किंवा चौरंग  जमिनीवर ठेवला जातो त्यावर पूजेचे साहित्य ठेवले जाते. पटाखाली पिकलेले तोंडले आवर्जून ठेवले जाते. 


तेरडे, आघाडे, कापशी वस्त्राची माळ, फुले वाहून नागांचे पूजन करतात काही ठिकाणी नागाची मूर्ती देखील पुजली जाते. दूध आणि भाताच्या लाह्यांचा नैवेद्य नागासाठी परसात ठेवला जातो. प्रसाद म्हणून पाच कडधान्य आदल्या दिवशी भाजली जातात, कारण नागपंचमीच्या दिवशी तवा वापरत नाहीत, शक्यतो स्वयंपाक घरात भाजले, कापले जात नाही, तसेच शेतकरी शेतात नांगर फिरवत नाहीत. घरातील स्त्रीवर्ग नागाचे पूजन करून उपास करतात.


पूर्वी पूजन करताना नागासाठी काही गाणी गायली जात असत हल्ली ती गाणी काळाच्या ओघात पुसट झाली आहेत.

नागपंचमीच्या एका कहाणी मध्ये एका स्त्रीला भाऊ नव्हता त्यावेळेस तीने नागाला आपला भाऊ मानले होते, एकेदिवशी नागाच्या वारुळात नागीण प्रसूत होत असताना ती स्त्री दिवा घेऊन उभी होती वळवणारे नागाचे पिल्लू पाहून एका पिल्लाच्या शेपटावर तिच्या हातातला दिवा निसटून पडला व त्याची शेपूट जळाली होती. त्या पिल्लास पुढे इतर मंडळी, छोटी पिल्ल, बिना शेपटाचा नाग म्हणून चिडवीत आई कडून सर्व हकीकत कळल्यावर ते पिल्लू त्या आपल्या आत्यास डंख मारण्यास गेले होते. मात्र आत्याने नागपंचमीची पूजा केली होती आपली प्रतिमा पाहून त्याचा राग पळाला पाटाखालचे तोंडले खाऊन तो घरी परतला आपल्या आईस लाल तोंड दाखवले ते पाहून आई घाबरली आपल्या आत्यास तू का डंख मारलास असे विचारताच त्याने सगळी हकीकत सांगितली. ही गोष्ट आज आपल्याला थोडी विचित्र वाटेल मात्र त्यामागील भावना आणि शुद्ध हेतू महत्वाचा नाही का?

धन्यवाद.



वाचा रूखवत











वाचा कुलस्वामिनीअष्टागराच्या


वाचा वेढी बद्दल माहिती 

वाचा नगावे बद्दल 

वाचा आलेवाडी बद्दल माहिती

वाचा नांदगाव बद्दल माहिती

वाचा टेंभी बद्दल माहिती

वाचा सरावली  बद्दल माहिती

वाचा बहाड बद्दल माहिती

वाचा पोखरण बद्दल माहिती

वाचा अष्टागर प्रस्तावना

10 comments:

  1. छान माहिती. लहानपणीचे दिवस आठवले. आजच्या दिवशी भाजलेली कडधान्ये खिशात घालून दिवसभर खात असू. तेरड्याची रोपे आणत असू. लाह्या आणि दूध हा नैवेद्य असे. चांगला लेख. असेच लिहीत जा. शुभेच्छा

    ReplyDelete
  2. छान माहिती. लहानपणीचे दिवस आठवले. आजच्या दिवशी भाजलेली कडधान्ये खिशात घालून दिवसभर खात असू. तेरड्याची रोपे आणत असू. लाह्या आणि दूध हा नैवेद्य असे. चांगला लेख. असेच लिहीत जा. शुभेच्छा

    ReplyDelete
  3. छान माहिती. लहानपणीचे दिवस आठवले. आजच्या दिवशी भाजलेली कडधान्ये खिशात घालून दिवसभर खात असू. तेरड्याची रोपे आणत असू. लाह्या आणि दूध हा नैवेद्य असे. चांगला लेख. असेच लिहीत जा. शुभेच्छा

    ReplyDelete
  4. खूप चांगला लेख आहे

    ReplyDelete
  5. Hari Om
    खरच छान माहिती संकलित केली आहे
    सुंदर मांडणी

    ReplyDelete
  6. खुपच छान माहीती लिहिली आहे .

    ReplyDelete

अष्टागरातील गुढीपाडवा

श्री गणेशाय नम:  नमस्कार,  मी अजित पंडीत पुन्हा एकदा आपले अष्टागर ब्लॉग मध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण अष्टागरात गुढी पाडवा कसा साजरा केला ज...